जिल्हा

४५ लिपिक-टंकलेखक झाले वरिष्ठ लिपिक

४५ लिपिक-टंकलेखक झाले वरिष्ठ लिपिक
४५ लिपिक-टंकलेखक झाले वरिष्ठ लिपिक फोटो: ठाणे वैभव
ठाणे महापालिकेत प्रथमच विक्रमी बढती ठाणे: ठाणे महापालिकेतील लिपिक आणि टंकलेखक असलेल्या ४५ कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ लिपिक पदावर बढती दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना बढती मिळाल्याने महापालिकेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. महापालिकेतील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडली होती महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पदोन्नती संदर्भात बैठक घेऊन या पात्र ४५ लिपिकांना अ वर्ग लिपिक पदाची बढती दिली आहे, त्यामुळे उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना यापुढे पदोन्नती देताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यांची पदोन्नती दर तीन ते पाच वर्षांनी होणार असून लिपिक पदावर देखिल महापालिकेला कर्मचाऱ्यांची भरती करता येणार आहे. हे कर्मचारी सुमारे १० ते १५ वर्ष पदोन्नतीपासून वंचित होते. त्यांना महापालिका आयुक्त श्री. राव आणि अतिरिक्त आयुक्त श्री.रोडे यांनी न्याय दिल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्त यांनी सफाई कर्मचाऱ्यांना तसेच चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांना यापूर्वी बढती देऊन त्यांना लिपिक पदावर बढती दिली आहे, असे देखिल महापालिका मुख्यालय उपायुक्त श्री.गोदेपुरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475