महाराष्ट्र

पेट्रोल पंप व्यवसायाच्या नावाखाली ४१ लाखांची फसवणूक

पेट्रोल पंप व्यवसायाच्या नावाखाली ४१ लाखांची फसवणूक
पेट्रोल पंप व्यवसायाच्या नावाखाली ४१ लाखांची फसवणूक फोटो: ठाणे वैभव
भिवंडी : नवीन पेट्रोल पंप उघडण्याच्या नावाने तीन जणांनी आपसात संगनमत करून शहरातील व्यवसायिकाला ४१ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरुण जैस्वाल, मनोज शर्मा, अमित अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजकुमार महेंद्र ठाकूर हे भिवंडीतील मानसरोवर येथील सोहम शिवम इमारतीत राहत आहेत.त्यांनी नवीन पेट्रोल पंप उघडण्याचे ठरवले होते. त्यासाठी १३ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २४ च्या कालावधीत या तिघा आरोपींनी संपर्कात आले. या आरोपींनी आपसात संगनमत करून वेगवेगळ्या फोनवरून आपण इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच पेट्रोल पंप उघडण्याकरिता रजिस्ट्रेशन फी,सिक्युरिटी फी,लायसन्स आणि मशिनरी आदींसाठी राजकुमारकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. तसेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या ई मेलद्वारेही पैशांसाठी मेल देखील केला होता. त्यामुळे राजकुमारने सदर आरोपींनी दिलेल्या अकाउंटवर वडिलांच्या बँक खात्यातून एकूण ४१ लाख ४९ हजार रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून पाठवले आहेत. त्यानंतर तिघांनीही ऑनलाईन पद्धतीने फसवणूक केल्याची बाब राजकुमारच्या लक्षात येताच त्याने १७ जानेवारी रोजी तूर्तास शहर पोलीस ठाणे गाठून तिघांवर फिर्याद नोंदवली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसातील गुन्ह्याची माहिती मिळताच तिघेही आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असून पुढील तपास पोलीस निरिक्षक गंगाराम वळवी करीत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475