जिल्हा

हळदी समारंभातील जेवणातून ४० वऱ्हाड्यांना विषबाधा

हळदी समारंभातील जेवणातून ४० वऱ्हाड्यांना विषबाधा
हळदी समारंभातील जेवणातून ४० वऱ्हाड्यांना विषबाधा फोटो: ठाणे वैभव
कल्याण: कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीतील बाविस्कर कुटुंबात शनिवारी रात्री हळदी समारंभानिमित्त जेवण जेवल्यानंतर ३०ते ४० जणांना उलट्या व जुलाब होऊ लागल्या. त्यांना उपचारार्थ रूग्णालयात नेण्याचा बाका प्रसंग ओढावला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्राप्त माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल मोहन प्राईड इमारतीमधील बाविस्कर कुटुंबात मुलीचा हळदी समारंभ शनिवारी होता. या समारंभानिमित्त रात्री आलेल्या पाहुणे आणि कुटुंबियांनी जेवण केल्यानंतर काही तासांनी उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने उपचारार्थ रूग्णालयात नेण्याचा प्रसंग ओढावला. या जेवणातील विषबाधेचा जास्त त्रास जेष्ठांना, बालकांना झाल्याचे समजते. यामध्ये ज्या मुलीची हळद होती ती, तिची आई, बहीण यांना देखील त्रास झाला. या धक्कादायक प्रकारामुळे रविवारी होणारा लग्न समारंभ कार्यक्रम रद्द करावा लागल्याचे कुटुंबियांच्या वतीने प्रसिध्दी माध्यमांना सांगितले. तसेच या घटनेप्रकरणी जेवणाच्या कंत्राटदारावर खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली असल्याचे समजते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475