जिल्हा

३२६ मुक्या जीवांना जीवदान

३२६ मुक्या जीवांना जीवदान
३२६ मुक्या जीवांना जीवदान फोटो: ठाणे वैभव
ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाची कामगिरी ठाणे : मागील सात महिन्यात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने संकटात सापडलेल्या ३२६ मुक्या जीवांची सुटका करून जीवदान दिले आहे. यामध्ये १९३ प्राणी आणि १३३ पक्ष्यांचा समावेश आहे. ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभाग वर्षभर आपत्ती काळात नागरिकांची सुटका करण्यात आणि तत्काळ उपाययोजना करत असतो. त्याचवेळी मांजर, कुत्रा पक्षी संकटात सापडले आहे त्यांची सुटका करा, असे कॉलही येतात. अशावेळी तेवढ्याच गांभीर्याने विभागाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन प्राणी-पक्षाची सुटका करतात. अशाप्रकारे १ जानेवारीपासून १९ ऑगस्टपर्यंत तब्बल ३२६ तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये १९३ तक्रारी प्राणी आणि १३३ तक्रारी या पक्ष्यांसंदर्भात आहेत. ठाणे शहरात गुरुवारी २७ जुलै रोजी दुपारी दीड वाजल्यापासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत म्हणजे सात तासात १३७.१२ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे ठीक ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याबरोबर नाल्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घोडबंदर रोड, आनंदनगर, येथील मुच्छाला कॉलेजजवळील नाल्यामध्ये एक म्हैस पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येऊन नाल्यात अडकली होती. तिला सुखरूप बाहेर काढत तिला जीवदान दिले. या वर्षातील मुक्याजीवांच्या तक्रारींचा तक्ता महिने        प्राणी      पक्षी जानेवारी     २६        ३५ फेब्रुवारी      २२        १४ मार्च           ३०        १७ एप्रिल         ३०        १७ मे               २२        १५ जून            २०        १६ जुलै            २८        १३ १९ ऑगस्ट  १५        ०६ एकूण         १९३     १३३

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475