जिल्हा

विनोद कांबळी यांना ३० लाखांची मदत

विनोद कांबळी यांना ३० लाखांची मदत
विनोद कांबळी यांना ३० लाखांची मदत फोटो: ठाणे वैभव
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती ठाणे : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेली ३० लाख रुपयांची मदत त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विनोद कांबळी यांच्या भेटीसाठी प्रताप सरनाईक गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, यापुढे त्यांच्यावर ठाण्यातील तीन रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. १५ दिवसांपूर्वी भिवंडी येथील आकृती रुग्णालयातील डाॅक्टरांचे पथक वांद्रे येथील कांबळी यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कांबळी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शक्य झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, कांबळी यांच्या कुटुंबियांनी शनिवारी त्यांना भिवंडी आकृती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक कांबळी यांच्यावर उपचार करत आहेत. कांबळी हे डाॅक्टर आणि माध्यमांसोबत संवादही साधताना दिसतात. कांबळी यांना चालताना त्रास होत होता. तसेच इतरही अनेक आजार त्यांना होते. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळताच त्यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर बुधवारी दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विनोद कांबळी यांना जेव्हा-जेव्हा उपचाराची गरज पडेल. त्यावेळेस, गंगुबाई संभाजी शिंदे, इंदिराबाई बाबूराव सरनाईक आणि आकृती रुग्णालय हे तीन रुग्णालय विनोद कांबळी यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मोफत उपलब्ध असतील. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार विनोद कांबळी यांची भेट घेतली. डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे. त्यांच्या बँक खात्यात चार ते पाच लाख जमा झाले आहेत आणि आणखी २० लाख असे एकूण ३० लाख रुपये विनोद कांबळी यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा केले जातील. आम्ही अजूनही मदतीसाठी आवाहन केले आहे. ते देखील त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा होतील, असे सरनाईक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475