जिल्हा

यंदा ठामपा निवडणुकीत २९५ ताई, माई आणि अक्का

यंदा ठामपा निवडणुकीत २९५ ताई, माई आणि अक्का
यंदा ठामपा निवडणुकीत २९५ ताई, माई आणि अक्का फोटो: ठाणे वैभव
ठाणे: महिलांना ५० टक्के राजकीय आरक्षण असले तरी त्याहीपेक्षा जास्त महिला उमेदवार ठाणे महापालिका निवडणुकीत उतरल्या आहेत. एकूण ६४१ उमेदवारांपैकी २९५ उमेदवार या महिला आहेत. त्यामुळे आत्ता समीकरणात महिला नगरसेवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ नगरसेवक पदांसाठी ६६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर ६४१ पैकी २९५ उमेदवार महिला असून बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या सहा उमेदवारांपैकी चार उमेदवार या महिलाच आहेत. आरक्षित जागांवर बहूतेक सर्वच पक्षांनी महिला उमेदवार दिले आहेत. शिवाय सर्वसाधारण गटातही महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वपक्षीय महिला उमेदवारांचा आकडा १००च्या आसपास आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका सभागृहात महिला राज दिसेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाने ८७ पैकी ४१ महिला उमेदवार दिले आहेत. भाजपने ४० पैकी २१, राष्ट्रवादी शरद पवार गटाने ६४ पैकी २३, अजित पवार गटाने ६६ पैकी ३३, शिवसेना ठाकरे गटाने ५३ पैकी ३३, काँग्रेसने ६४ पैकी २९, तर मनसेने २३ पैकी १६ महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याशिवाय इतर पक्ष आणि अपक्ष अशा ९९ महिला उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475