जिल्हा

नगरपालिकेत सापडलेले २८ हजार रुपये अधिकाऱ्यांकडे केले सुपूर्द

नगरपालिकेत सापडलेले २८ हजार रुपये अधिकाऱ्यांकडे केले सुपूर्द
नगरपालिकेत सापडलेले २८ हजार रुपये अधिकाऱ्यांकडे केले सुपूर्द फोटो: ठाणे वैभव
युवतीच्या प्रामाणिकपणाचे अंबरनाथमध्ये कौतुक अंबरनाथ: सध्या मार्च महिना असल्याने वेळेत कर भरण्यासाठी नगरपालिकेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. याच दरम्यान कर भरण्यासाठी आलेल्या कुणा नागरिकाचे 28 हजार रुपये नगरपालिकेच्या कर विभागाच्या दालनासमोर दामिनी पेडणेकर या युवतीला सापडले, ते तिने नगरपालिका महिला सुरक्षा रक्षकाकडे दिले. महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने ते पालिका अधिकाऱ्यांकडे स्वाधीन केले. दामिनी हिने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल तिचे कौतुक होत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये कर भरण्यासाठी दामिनी पेडणेकर ही युवती आली होती. कर भरल्यानंतर जाताना दामिनीला कर विभागाच्या दरवाज्यासमोर २८ हजार इतकी रक्कम सापडली. दामिनी हिने सापडलेली रक्कम स्वतःकडे न ठेवता त्यांनी प्रामाणिकपणे ती तेथे उपस्थित असलेल्या महिला सुरक्षा रक्षक शामल ताडगे यांच्याकडे सुपूर्द केली. या घटनेची माहिती मिळताच कर अधीक्षक नरेंद्र संख्ये तसेच मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि कर अधिक्षक नरेंद्र संख्ये यांनी दामिनी पेडणेकर यांच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक करून त्यांचा सत्कार केला. पालिका आवारात सापडलेली रक्कम कोणाची असल्यास संबंधित नागरिकांनी आवश्यक पुराव्यासह अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475