महाराष्ट्र

लॉंग मार्चमधील २७ आशावर्कर महिलांना उष्माघाताचा फटका

लॉंग मार्चमधील २७ आशावर्कर महिलांना उष्माघाताचा फटका
लॉंग मार्चमधील २७ आशावर्कर महिलांना उष्माघाताचा फटका फोटो: ठाणे वैभव
उपचारासाठी रुग्णालयात दाखल
भिवंडी : गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो महिलांनी शासनाच्या निषेधार्थ ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी असा लॉंग मार्च शहापूरातून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला आहे. आज दुपारी लॉंगमार्च भिवंडीतील सोनाळे गावाच्या हद्दीत आला असता त्यामधील महिलांना उष्माघाताचा फटका बसल्याने २७ महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना भिवंडीतील इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम.ए.पाटील,सरचिटणीस भगवान दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा लॉंगमार्च सुरु असून तो आज गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी दुपारी  दुपारी सोनाळे गावच्या हद्दीत पोहचला. त्यावेळी उष्माघाताने २७ महिलांची प्रकृती अचानकपणे खालावली. यावेळी चक्कर येवून बेशुध्द अवस्थेतील सर्व महिलांना तूर्तास रुग्णवाहिका मधून भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काल ७ फेब्रुवारी रोजी या पदयात्रेचे शहापूर येथील विश्रामगृहातून बुधवारी सकाळी ९:३० वाजता सुरू होऊन दुपारी वाशिंद येथे भोजन करून विश्रामानंतर काल रात्री पडघ्यात वास्तव्य केले होते. त्यानंतर पुन्हा आज गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता पदयात्रा सुरू झाली.हि पदयात्रा भिवंडीतील सोनाळे येथे रवाना झाली. परंतु दुपारी १ ते दीड वाजताच्या उष्माघाताच्या कहराने लता बाळकृष्ण दामसे,मीना ठाकरे,साधना हरड, प्रतीक्षा ठाकरे,आनंदी सोंगा,शारदा विषे,प्रतीक्षा डोहळे,सीमा भला,भक्ती राऊत,विशाखा पाटील,अंकिता किसले,संगीता लुटे,वंदना कबाडे,प्रमिला जाधव,वंदना बोरकर,आम्रपाली पंडित,प्रतिभा सूर्यवंशी,संगीता काशीकर,वंदना इंगले,पूजा कांबळे,सुनंदा जाधव,प्रियंका क्षीरसागर,माया मोरे,मनीषा पवार,कांचन म्हस्कर,इरोपा सोनवणे,ललिता रोकडे या २७  महिलांना अचानकपणे चक्कर येवून अस्वस्थ वाटू लागले.तर दम लागल्याने यातील ४ ते ५ महिलांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यानंतर तात्काळ या सर्व महिलांना रुग्णवाहिकांमधून इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आपले. त्यांच्यावर झालेल्या उपचारानंतर सर्व महिला सुस्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.तर मिळालेल्या माहितीनुसार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी नंतरच हा लॉंग मार्च शांत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दरम्यान इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालयात कोणीही सरकारी अधिकारी अथवा  राजकीय पक्षाचे पुढारी फिरकले नाहीत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475