जिल्हा

ऑनलाईन जॉबची बतावणी करून 26 लाखांची फसवणूक

ऑनलाईन जॉबची बतावणी करून 26 लाखांची फसवणूक
ऑनलाईन जॉबची बतावणी करून 26 लाखांची फसवणूक फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ऑनलाईन कमिशन बेस्ड टास्क जॉब केल्यास भरघोस कमिशन देण्याची बतावणी करीत सायबर गुन्हेगारांनी ठाण्यातील दोन जणांची दोन वेगवेगळ्या घटनेत 26 लाख 15 हजार इतक्या रकमेची फसवणूक केली. या प्रकरणी चितळसर आणि कोपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील साईनाथनगर, कोपरी येथे राहणारे संदेश एखंडे (47) यांना 28 एप्रिल ते 2 मे 2023 या काळात एका अनोळखी महिलेने व्हाट्सएप व टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून संपर्क साधत ऑनलाइन कमिशन बेस्ड टास्क जॉब मिळेल व त्यावर भरपूर कमिशन देखील मिळेल अशी बतावणी केली. त्यानंतर तक्रारदार यांना फी स्वरूपात वेळोवेळी 17 लाख 74 हजार रुपये सदर टास्कमध्ये ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर कुठलेही काम अथवा कमिशन दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संदेश यांनी कोपरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या घटनेप्रकरणी कोपरी पोलिसांनी 10 मे 2023 रोजी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत तुळशीधाम येथे राहणारे जयप्रकाश दिवेदी (27) यांना एका वेबसाईटवरून अज्ञात इसमाने संपर्क साधून ऑनलाईन कमिशन बेस्ड टास्क जॉब देण्याची बतावणी केली. त्यानंतर तक्रारदार यांना काही कमिशन देखील दिले. मात्र त्यानंतर टास्कमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून 8 लाख 41 हजाराची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी 10 मे 2023 रोजी चितळसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475