जिल्हा

जिल्हा परिषदेचे २४ शिपाई, वाहनचालक झाले कनिष्ठ सहाय्यक

जिल्हा परिषदेचे २४ शिपाई, वाहनचालक झाले कनिष्ठ सहाय्यक
जिल्हा परिषदेचे २४ शिपाई, वाहनचालक झाले कनिष्ठ सहाय्यक फोटो: ठाणे वैभव
ठाणे: जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत १९ जून, २०२५ रोजी शिपाई संवर्गातून २२, वाहनचालक संवर्गातून दोन, अशा एकूण २४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक (वर्ग-३) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीविषयी माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे यांनी सांगितले की, “कार्यक्षमतेच्या आधारे पदोन्नतीची ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली असून, समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पाडली आहे.” या पदोन्नतीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सर्व नवपदोन्नत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना असे सांगितले की "पदोन्नती ही केवळ पदवृद्धी नसून, आपल्या सेवाभावाला, प्रामाणिकपणाला आणि कार्यक्षमतेला मिळालेली पावती आहे. नव्या जबाबदाऱ्या ही संधी आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रगतीला हातभार लावण्याची. आपण सर्वांनी एकजुटीने जिल्हा परिषद ठाणेची कामगिरी अधिक समृद्ध आणि उल्लेखनीय बनवावी, हीच माझी मनःपूर्वक शुभेच्छा!" यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) प्रमोद काळे, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांच्या सेवेत झालेल्या पदोन्नतीमुळे कार्यालयीन कार्यप्रवाह अधिक प्रभावी व परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475