जिल्हा

पात्र कंपनीला डावलून मर्जीतील कंपनीला २२ कोटींचे काम!

पात्र कंपनीला डावलून मर्जीतील कंपनीला २२ कोटींचे काम!
पात्र कंपनीला डावलून मर्जीतील कंपनीला २२ कोटींचे काम! फोटो: ठाणे वैभव
ठाणे महापालिकेत पुन्हा टेंडर घोटाळा ठाणे : ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आला आहे. पात्र कंपनीला डावलून अपात्र असलेल्या मर्जीतील कंपनीला तब्बल २२कोटींचे काम देण्यात आले आहे. संबंधित कंपनीला हे काम मिळावे यासाठी यासाठी पालिकेवर राजकीय दबाव असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. पालिकेच्या उपअभियंत्याच्या विरोधात सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग केले आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने कोलशेत, माजिवडा आणि विटावा या मलप्रक्रिया केंद्रासाठी परिचलन निगा, देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. तब्बल २२ कोटींचे हे काम होते. यासाठी काही कंपन्यांनी निविदा अर्ज देखील भरले होते. यामध्ये तोशिबा आणि एस.एस इन्फ्रा या कंपन्या पात्र देखील ठरल्या होत्या आणि त्यांचा अनुभव सुद्धा होता. मात्र असे असताना या कंपन्यांना डावलून अनुभव नसलेल्या आणि पात्र नसलेल्या मे.ए.के.इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रा.लि या मर्जीतल्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे निविदा मागवताना वैयक्तिक निविदा मागवण्यात आल्या असताना हे काम मिळवण्यासाठी दुसऱ्या कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर दाखवून निविदा भरली. आणि ठाणे महापालिकेनेही नियम डावलून या कंपनीला हे काम दिले असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. यामध्ये ठाणे महापालिकेच्या उप अभियंत्याने निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित उप अभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असताना अशाप्रकारे कोणताच भ्रष्टाचार झाला नसून सर्व निविदा ही नियमाप्रमाणेच राबवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475