जिल्हा

भिवंडी महापालिका क्षेत्रात २१ अनधिकृत शाळा

भिवंडी महापालिका क्षेत्रात २१ अनधिकृत शाळा
भिवंडी महापालिका क्षेत्रात २१ अनधिकृत शाळा फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण २१ अनधिकृत शाळा असून अशा शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याला प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, असे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. शहरात शासनाच्या परवानगी शिवाय २१ अनधिकृत प्राथमिक शाळा सुरु असून त्यांची यादी महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या शाळांमध्ये पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांचे नजिकच्या शासनमान्य शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. संबंधित अनधिकृत शाळांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची नोटीस बजावली असून शाळेचे संचालक आणि व्यवस्थापनावर लवकरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील,अशी माहिती भिवंडी मनपा प्राथमिक शिक्षण विभागा मार्फत देण्यांत आलेली आहे. अनधिकृत शाळांच्या यादीत रॉयल इंग्रजी शाळा (पटेल कंपाउंड धामणकर नाका), नोबेल इंग्रजी शाळा (अवचितपाडा), अलरजा उर्दू प्राथमिक शाळा (गैबी नगर), मराठी प्राथमिक शाळा (पाईप लाईन, टेमघर), इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक शाळा (पाईप लाईन टेमघर), द लर्निंग प्राथमिक शाळा (टेमघर पाडा), एकता इंग्रजी पब्लिक शाळा (फातमा नगर नागांव), एकता उर्दू पब्लिक शाळा (फातमा नगर नागांव), ए आर रेहमान उर्दू प्राथमिक शाळा (फातमा नगर नागाव), जवेरिया उर्दू प्राथमिक शाळा (गैबी नगर), विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा (नवी वस्ती), ए.पी.जे अब्दुल कलाम इंग्रजी प्राथमिक शाळा (रावजीनगर, पॉवर हॉऊस जवळ), अलहिदाया पब्लिक प्राथमिक शाळा (पटेल नगर, बाळा कंपाउंड), तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा (जैतनपुरा), इकरा इस्लामिक मकतब शाळा (नदी नाका), कैसर बेगम इंग्रजी शाळा, नागांव, सहारा हॉटेलजवळ), फरहान इंग्रजी प्राथमिक शाळा (दिवान शाह दर्गा रोड), गीतांजली माध्यमिक शाळा (गायत्रीनगर व-हाळेदवी), ए.बी. इंग्रजी प्राथमिक शाळा (भैरव सायझिंगसमोर), विद्या निकेतन इंग्रजी प्राथमिक शाळा (भंडारी कम्पाऊंड) आज सरस्वती इंग्रजी प्राथमिक शाळा (नवी वस्ती) या शाळांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475