महाराष्ट्र

ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी!

ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी!
ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! फोटो: ठाणे वैभव
मुंबई: सध्या देशभरात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असलेली पाहायला मिळत आहे. आगामी काळात दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण ऑक्टोबर महिन्यात असल्याने, बँकांच्या सुट्ट्यांची मोठी मालिका या महिन्यात पाहायला मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच मोठ्या सुट्ट्यांनी होत आहे. २ ऑक्टोबर हा गांधी जयंतीमुळे राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो. कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये महासप्तमीपासून सुट्ट्या सुरू होत आहेत. यात २७ सप्टेंबर (शनिवार), २८ सप्टेंबर (रविवार), २९ आणि ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर (महानवमी) आणि २ ऑक्टोबर (गांधी जयंती) या सलग ६ दिवसांचा समावेश आहे. १ ऑक्टोबर (महानवमी) रोजी बिहार, झारखंड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरासह अनेक राज्यांमध्ये बँका बंद असतील. केरळमध्ये ३० सप्टेंबरला सुट्टी असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवसांची मोठी सुट्टी मिळाली आहे. सणासुदीच्या या काळात बँकांमध्ये होणारी गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी नेट बँकिंग, यूपीआय आणि मोबाइल बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर करावा. तसेच, मोठी रोख रक्कम काढायची असल्यास, सुट्टीचा दिवस पाहून कामाचे नियोजन करा. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आपल्या स्थानिक बँकेच्या शाखेशी संपर्क साधून सुट्ट्यांची निश्चिती करून घ्यावी.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475