जिल्हा

ठाण्यातील १७६ मतदान केंद्रे संवेदनशिल!

ठाण्यातील १७६ मतदान केंद्रे संवेदनशिल!
ठाण्यातील १७६ मतदान केंद्रे संवेदनशिल! फोटो: ठाणे वैभव
पोलिसांच्या चोख बंदोबस्त ठेवणार ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीसाठी पालिकेने २०१३ मतदान केंद्रे निश्चित केली असून त्यातील १७६ मतदान केंद्रे संवेदनशिल आढळून आली आहेत. सर्वाधिक संवेदनशिल केंद्रे ही कळवा, मुंब्रा पोलिस ठाणे अंतर्गत आणून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी या ठिकाणी अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात येणारबहे. ठाणे महापालिकेची निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी पालिका आणि पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने ३३ प्रभागांतील संवेदनशिल मतदान केंद्रांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मतदान केंद्रांची संख्या जास्त असलेले, बाजारपेठ परिसर, उमेदवारांची संख्या आणि त्यामधील संघर्ष, अरुंद परिसर, मुख्य रस्तालगतचा परिसर, एका केंद्रावरील जास्तीचे बुथ इत्यादी निकषावर संवेदनशिल मतदान केंद्र ठरवण्यात आले आहेत. त्याची संख्या १७६ इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक संवेदनशिल मतदान केंद्रे ही राबोडी, कळवा, मुंब्रा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत आहेत. तर ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकमेव प्रभाग संवेदनशिल आहे. ठाणे नगर या पोलिस ठाण्याअंतर्गत महागिरी येथील ३ क्रमांकाचा बुथ संवेदनशिल आहे. कळवा पोलिस ठाणे अंतर्गत येथील प्रभाग क्रमांक ९ मधील बुथ क्रमांक ४, प्रभाग क्रमांक २३ मधील ७, २४ मधील ५, २५ मधील १२ हे चार मतदान केंद्र संवेदनशिल आहेत. तसेच राबोडी पोलिस ठाणे अंतर्गत प्रभाग क्रमांक १० मधील ९, २, ४ क्रमांकाचे तर प्रभाग क्रमांक ११ मधील ६ आणि ७ क्रमांकाचा बुथ संवेदनशिल आहे. झोपडपट्टी परिसर आणि राजकीयदृष्टया येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. मुंब्रा पोलिस ठाणे अंतर्गत प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरीवस्ती सर्वाधिक आहे. त्यामुळे बुथ क्रमांक ७ आणि १० संवंदेनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये दोन पक्षांच्या उमेदवारांमध्ये चढाव्ओढ असल्याने ६ क्रमांकाच्या बुथवर गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक ३० मधील बुथ क्रमांक ६, १२ ही गर्दीची ठिकाणे तर बुथ क्रमांक ४ आणि ५ वर दोनही राष्ट्रवादीमध्ये काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील ५, १५ हे बुथ संवेदनशिल आहेत. मिश्र वस्ती आणि रस्त्याच्या कडेला केंद्र आहेत. प्रभाग क्रमांक ३२ मधील ३, ८, ५ येथे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये थेट लढत आहे. त्यापैकी घासवाला कंपाऊड येथे मतदारांचा सर्वच पक्षांना विरोध असल्याचे आढळून आले आहे. प्रभाग क्रमांक ३३ मधील ५, १० या केंद्रामध्येही हिच परिस्थिती आहे. तर दिवा येथील प्रभाग क्रमांक २७ मध्ये १६ क्रमांकाचे एकच केंद्र असल्याने तेही संवेदनशिल म्हणून जाहिर करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475