जिल्हा

१७ हजार पोलीस आणि होमगार्ड

१७ हजार पोलीस आणि होमगार्ड
१७ हजार पोलीस आणि होमगार्ड फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांच्या गुरुवारी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त उभारला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकूण १०,९०८ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून त्यांच्या मदतीसाठी ६२९५ होमगार्ड सज्ज ठेवण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस बलाच्या सहा कंपन्या आणि एक प्लॅटून असा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. एखाद्या भागात संशयास्पद हालचाली किंवा गडबड आढळल्यास तत्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त रवाना केला जाणार आहे. उल्हासनगरमध्ये विशेषतः पोलीस ॲक्शन मोडवर असून, तेथे २२९५ पोलीस कर्मचारी आणि दोन एसआरपी तुकड्या तैनात राहणार आहेत. डीसीपी सचिन गोरे यांनी स्वतः बंदोबस्ताचा आढावा घेत ३६ अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरवण्याचे आदेश दिले आहेत. शहरात पेट्रोलिंग वाढवण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475