जिल्हा

ठाण्यात १२९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाण्यात १२९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
ठाण्यात १२९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मागिल अनेक वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या ठाणे पोलिस आयुक्तालयातील १२९ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दणका दिला आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयामधील पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक भागातील बेकायदेशीर धंदे बोकाळले होते. मागिल महिन्यात दोन दिवसांत चार खून झाल्याच्या घटना घडल्या होत्या. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घरफोडीचे गुन्हे होण्याची शक्यता असून शहराच्या विविध भागात अमली पदार्थांची विक्री रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून पोलिस आयुक्त श्री. डुंबरे यांनी १६ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ५६ पोलिस निरीक्षक, ५१ सहायक पोलिस निरीक्षक आणि २१ पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्या केल्या. बदल्या झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांमध्ये नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महाजन, राबोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त श्री. डुंबरे यांच्या आदेशानुसार मुख्यालय उपायुक्त मीना मकवाना यांनी या बदल्यांचे आदेश काढले आहे. दरम्यान ठाणे पोलिस आयुक्तालयात अनेक वर्षे सेवा केलेले मदन बल्लाळ यांची मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालय येथून ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे तसेच ममता डिसोझा यांच्याकडे वर्तकनगर सहायक आयुक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. भास्कर पुकले यांच्याकडे सहाय्यक आयुक्त प्रशासन तसेच सुधाकर सुरडकर यांच्याकडे विशेष शाखा १ सहायक आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे. सिद्धार्थ गाडे यांच्याकडे विशेष शाखा ३ चा तर संकेत देवळेकर यांच्याकडे विशेष शाखा २च्या सहायक आयुक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475