जिल्हा

१२०० कोटींची फसवणूक: आरोपींना पोलिस कोठडी

१२०० कोटींची फसवणूक: आरोपींना पोलिस कोठडी
१२०० कोटींची फसवणूक: आरोपींना पोलिस कोठडी फोटो: ठाणे वैभव
गुंतवणूकदारांची ठाणे न्यायालयाच्या आवारात निदर्शने ठाणे : बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्यप्राय परताव्याचे आमीष दाखवणाऱ्या टीडब्लूजे कंपनीचे मालक समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर आणि अमित बालम या तिघांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढून मिळाली आहे. याचदरम्यान फसवणूक झालेल्या १६ जिल्ह्यातील १५० हून अधिक गुंतवणूकदारांनी सोमवारी एकत्र येत ठाण्यात नार्वेकर यांच्याविरोधात निदर्शने केली. आरोपींना न्यायालयात नेल्यावर फसवणुक झालेल्या गुंतवणूकदारांनी ठाणे न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातल्याचे दिसून आले. महाराष्ट्रामध्ये एकूण १,२०० कोटी रूपयांची फसवणूक करून हजारो गुंतवणूकदारांच्या रक्कमेचा अपहार करणाऱ्या तिघांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात येथून अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यावर त्या तिघांना दहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. सोमवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा ठाणे न्यायालयात पोलिसांनी त्यांना हजर केले. त्या तिघांना न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढून मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तदपूर्वी सोमवारी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी नार्वेकर यांची पोलिस कोठडी संपत असल्याने ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या बाहेर नार्वेकर याच्याविरोधात एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली. तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची भेट घेत, यावेळी आरोपी नार्वेकर यांचा एक व्हायरल झालेला व्हिडीओ पोलिस यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान गुंतवणूकदारांनी त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत अशी मागणीही करत, पोलिस यंत्रणेवर विश्वास असून पोलिस आम्हाला न्याय देतील असेही गुंतवणूकदार भारत पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. राज्यात जवळपास १२ हजार कोटी तर ठाणे जिल्ह्यात ७२ कोटींची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475