जिल्हा

घरसामान स्थलांतरित करताना १० लाखांचा ऐवज लंपास

घरसामान स्थलांतरित करताना १० लाखांचा ऐवज लंपास
घरसामान स्थलांतरित करताना १० लाखांचा ऐवज लंपास फोटो: ठाणे वैभव
टेम्पो चालकासह तिघांना हिललाईन पोलिसांकडून अटक ​उल्हासनगर : टिटवाळा येथून नेवाळी नाका परिसरात घरसामान स्थलांतरित करणाऱ्या एका ५० वर्षीय महिला पत्रकाराची टेम्पो चालक आणि हमालांनी संगनमताने १० लाख रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी त्वरित कारवाई करत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिल्पा ठक्कर (५०) या टिटवाळा येथून आपले घरगुती सामान नेवाळी नाका रोड येथील दुर्गामाता नगरमधील रूममध्ये स्थलांतरित करत होत्या. सामान वाहून नेण्यासाठी आलेल्या टेम्पोसोबत दोन हमाल होते. सामान चढवत आणि उतरवत असताना या दोघांनी टेम्पो चालकाशी संगनमत केले. ​फिर्यादी महिला एकटी असल्याचे पाहून आरोपींनी संधी साधली. सामान घरात लावत असताना या त्रिकुटाने फिर्यादीची नजर चुकवून सामानातील सहा लाख रुपये रोख, आठ तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण १० लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीचा हा प्रकार लक्षात येताच शिल्पा ठक्कर यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ​पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक बेडकुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475