ठाणे: ठाणे शहर भारतीय जनता पक्षाची जम्बो शहर कार्यकारिणी शहर अध्यक्ष संजय वाघुले यांनी आज जाहीर केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीची रणनीती आखण्यास भाजपने सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
या कार्यकारिणीत चार सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, मोर्चा अध्यक्ष, प्रकोष्ट सेल संयोजक आणि कार्यकारिणी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
नवनियुक्त पदाधिकारी आणि सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी विशेष सभा झाली. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विभागीय संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्हा सरचिटणीसपदी मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, डॉ. समीरा भारती, उपाध्यक्षपदी जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, विक्रम भोईर, राजेश गाडे, सागर भदे, रमेश आंब्रे, महेश कदम, विद्या शिंदे, वर्षा पाटील, श्रुती महाजन, हर्षराज नारंग, चिटणीसपदी गौरव सिंह, राजेश सावंत, संतोष साळुंखे, विजय भोईर, किशोर गुणीजन, रामकिसन जैस्वार, तृप्ती जोशी-पाटील, श्रुतिका कोळी-मोरेकर, माधुरी मेटांगे यांची, खजिनदारपदी सुदेश खारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी स्नेहा अंकुश पाटील, युवा मोर्चा अध्यक्षपदी सुरज दळवी, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विरसिंह पारछा, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुरेश पाटील, अनुसुचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी नताशा निशांत, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी शरिफ शेख यांची नियुक्ती झाली आहे. तर कायदा प्रकोष्टच्या संयोजकपदी अॅड. मकरंद अभ्यंकर, प्रज्ञा संयोजकपदी निखिलेश सोमण, उद्योग संयोजकपदी शिशिल जोग, व्यापारी संयोजकपदी मितेश शहा, शिक्षक संयोजकपदी संभाजी शेळके, मच्छिमार संयोजकपदी अमरिश ठाणेकर, अध्यात्मिक संयोजकपदी अश्विनी पटवर्धन, ज्येष्ठ कार्यकर्ता संयोजकपदी अनिल भदे, भटके-विमुक्त संयोजकपदी गजानन आंधळे, आर्थिक प्रकोष्टपदी सीए विनोद टिकमानी, कामगार संयोजकपदी मधुसुदन देसाई, सहकार संयोजकपदी अॅड. अलकेश कदम, दिव्यांग संयोजकपदी आनंद बनकर, वैद्यकीय संयोजकपदी डॉ. अपर्णा ताजणे, सोशल मिडीया संयोजकपदी अलोक ओक, स्लम प्रकोष्टपदी कृष्णा भुजबळ, सांस्कृतिक संयोजकपदी देवराज साळवी, आयुष्मान भारत संयोजकपदी कैलास म्हात्रे, एक भारत श्रेष्ठ भारत संयोजकपदी राजेश जाधव, फ्रेंड्स ऑफ बीजेपी संयोजकपदी दत्तात्रेय घाडगे, साऊथ इंडियन प्रकोष्ट संयोजकपदी सुकुमार शेट्टी, उत्तर भारतीय संयोजकपदी राजकुमार यादव, गुजराती संयोजकपदी राकेश कतीरा, ट्रान्सपोर्ट संयोजकपदी वसंत कराड, राजस्थानी प्रकोष्टपदी महेंद्र जैन, जैन संयोजकपदी राकेश जैन, क्रीडा संयोजकपदी राजेंद्र मुणनकर व सहसंयोजकपदी डॉ. हेता हरेश ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी गोपाळ खामकर, गजानन संत, सई कारूळकर, मिनाक्षी मिस्त्री, सिद्धेश पिंगुळकर, सुनिल कोळपकर, मनुजेंद्र स्नेही, हिरोज कपोते, बाबुसिंग राजगुरू, धनंजय भोसले, अमित नांदगावकर, डी. आर. कदम, दिलीप शाहा, दिपक नायडू, भानुदास भोईर, महेश विनेरकर, विनोद भगत, गणेश भगत, रेश्मा पवार, अर्चना भुषण पाटील, अमोल ऐतवडेकर, रितू सेखोन, शांताराम चौधरी, राकेश चौगुले, प्रितम डोके, मिलिंद हेब्बाळकर, गौरी देशमुख, दिपक म्हात्रे, सांबा सागवेकर, विनोद देसाई, अनिल चौधरी, भरत पडवळ, संगिता सांडे, नरेश ठाकूर, नंदा रावरळे, सुचित्रा भोईर, प्रमोद चव्हाण, प्रकाश राऊळ, विक्की टिकमाणी, शुभांगी खांडेकर, सचिन आप्पा मोरे, हरीष हुद्द्यावर, शिवाजी मोरे, योगेश गांगुर्डे, राम विचारे, उषा पाटील, स्वाती देशमुख, किशोर मणेरा, राजीतराम तिवारी, अरविंद कलवार, राजू सिंग, नितेश शिंदे, विजय रांजणे, अशोक बाबूराव पाटील, कविता पवार, रश्मी मोरे, उषा वाघ, शालिनी तल्ला, पुजा गंद्रे, तृप्ती शेरे, मालती माळी, दिव्या दवे, विशाखा कणकोसे, शिल्पा जिठा, अजय शेडगे, मनोज शुक्ला, ओम जैसवाल यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यालयीन मंत्रीपदी दत्तात्रेय आपटे आणि शशिकांत कुर्ले यांची नियुक्ती केली आहे.