जिलबीचे पैसे मागितले म्हणून भावाच्या डोक्यात मारला वजनकाटा

ठाणे : जिलबीचे पैसे मागितल्याच्या रागामुळे भावाने भावाच्या डोक्यात वजनकाटा मारल्याची धक्कादायक घटना श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली.

वागळे इस्टेटमधील साठेनगर येथे २५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. येथील फिर्यादी कैलासनाथ यादव (40) हे मिठाई बनवतात. त्यांचा भाऊ राजेश यांनी आरोपी यांच्याकडे जिलबीचे पैसे मागितले. या कारणावरून आरोपीने राजेश यांच्या डोक्यात वजन काट्याचे वजन मारले. त्याचवेळी हातगाडीवरील उकळते तेल कढईतून उडून त्यांच्या चेह-यावर पडून गंभीर जखमी झाले.

जखमी राजेश यांना औषधोपचारासाठी ऐरोलीतील नॅशनल बर्न्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकाराबाबत फिर्यादींनी आरोपीविरुद्ध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार इघे हे करत आहेत.