मेथीच्या दरात दुप्पटीने वाढ

नवी मुंबई: श्रावण महिन्यात एपीएमसी बाजारात पालेभाज्यांची आवक अधिक असते. त्यामुळे पालेभाज्यांचे दर कमी होत असतात, परंतु बुधवारी बाजारात मेथीची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात मेथी दुप्पट दराने विक्री होत आहे.

मंगळवारी ६ ते ७ रुपयांनी विकली जाणारी मेथीची जुडी बुधवारी बाजारात १२ ते १५ रुपयांनी विक्री होत होती. श्रावण महिन्यात पालेभाज्यांना जास्त मागणी असते. त्यामुळे या कालावधीत पालेभाज्या महाग होतात. मंगळवारपर्यंत मेथीचे दर आवाक्यात होते. बुधवारी बाजारात मेथीची आवक अचानक घटली आहे. मंगळवारी एपीएमसीत एक लाख १२ हजार २०० क्विंटल आवक झाली होती. मात्र बुधवारी बाजारा मेथीची ४५ टक्के आवक घटली असून ६७ हजार ५००क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे दरात दुप्पट वाढ झाली आहे.