जेएनपीटीकडे जाणा-या अवजड वाहनांची गर्दी कमी करणार

खड्डयात गेला मुंबई-नाशिक महामार्ग

ठाणे : मुंबई -नाशिक महामार्गावरील रस्ता दिवसेंदिवस ‘खड्ड्यात’ जात असतानाच, जेएनपीटीकडे जाणा-या अवजड वाहनांची गर्दी कमी करण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यासाठी जेएनपीटीकडे जाणा-या अवजड वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी अधिसूचना क्र. 1/8/23 चा 108 बदल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली.

ही अवजड वाहने ऐरोली-पूर्व द्रुतगती महामार्गाने दिवसा जेएनपीटीला जाऊ शकतात, त्यासाठी ही अधिसूचना नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे जारी करण्यात आली. त्यामुळे या फेरबदलाचा दिवसा नाशिक महामार्गावर परिणाम होणार नाही.

जेएनपीटी, कळंबोली, नवी मुंबई, मुंब्रा बायपासमार्गे येणा-या व भिवंडी, नाशिक, गुजरात तसेच मुंबईकडून ठाणे शहरात येणा-या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सर्व शहरातील मार्गावरून सकाळी पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार आहे तसेच नाशिक ते मुंबई व मुंबई ते नाशिक महामार्गावरील खारीगाव टोलनाका ते पडघापर्यंत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे संबंधित प्राधिकरणांकडून बुजविण्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनांची ये-जा तीस दिवस जारी करण्यात आली आहे. त्याकरीता गुजरातकडून येणा-या वाहनांसाठी वाहतूक सूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4.5 नुसार अहमदाबाद गुजरातकडून जेएनपीटीकडे जाणा-या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना माजिवडा येथे पहाटे पाच ते रात्री 11 वाजेपर्यंत मुंब्रा बायपास मागार्ने मार्गस्थ होण्याची मुभा दिली आहे. या पर्यायी मार्गावर जाणारी वाहने घोडबंदररोडने माजिवडा जंक्शन येथून उजवे वळण घेऊन आनंदनगर चेकनाका, ऐरोली, रबाळे, तुर्भेमार्गे जेएनपीटीच्या दिशेने दिवसा 12 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मार्गस्थ होतील, असे ठाणे शहर वाहतूक शाखाच्या अधिसूचनेत नमूद केले आहे.