उद्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

ठाणे : मध्य रेल्वे रविवारी ३० एप्रिल २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मुंबईतील उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक परीचालीत करण्यात येणार आहे.

सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर. छशिमट मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दु. ३.३५ पर्यंत सुटणा-या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील व त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याहून पुढे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशीराने पोहोचतील.

ठाण्याहून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील व त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. पुढे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

छशिमट-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छशिमट अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असेल.

छशिमट/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणा-या तसेच छशिमट/वडाळा रोड येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ पर्यंत वांद्रे/गोरेगावसाठी सुटणा-या डाउन हार्बर सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दु. ३.२० पर्यंत छशिमट मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छशिमट मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर सेवा बंद राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील. हार्बर प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.