मफतलाल मर्कचे सफाईदार विजय

ठाणे: शुक्रवारी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या अ गटातील उपांत्य लढतीत गतवर्षीच्या अजिंक्य मफतलाल क्रिकेट क्लबने टेलीपरफॉर्मन्सची १८३ धावसंख्या निम्मा संघ राखून ओलांडली. आणि सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला.

विजयी संघातर्फे सामनावीर सिद्धांत आधाटरावने ५५ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह दमदार ५४ धावा केल्या. त्याला अझीम काझीने ५६ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांसह ६४ धावा फटकावून सुरेख साथ दिली. पार्सेकरने २४ धावांत चार बळी घेतले. पराभूत संघाच्या हारविक देसाईने ६८ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह ७२ धावा केल्या. दमट खेळपट्टीमुळे सामना उशिरा सुरू झाला. तो ३३ षटकांचा होता.

सेंट्रल मैदानावर ब गटातील पहिल्या फेरीत स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या मर्क स्पोर्ट्स क्लबने एल अँड टी ची १३० धावसंख्या दोन विकेटच्या मोबदल्यात सहज ओलांडत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मर्कच्या वैष्णव साईलने ३१ चेंडूत चार चौकारांसह नाबाद ३७ धावांची खेळी केली. त्याची सामनावीर म्हणून निवड झाली.