नवी मुंबई : नवी मुंबईमधील करावे गावातील वृतपत्र विक्रेता रमेश तांडेल यांची मुलगी रितू तांडेल हिने बी. कॉम. बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये ९५टक्के गुण मिळवून धवल यश संपादन केले आहे.
रितू तांडेल हिने पहिली ते सातवी ज्ञानदीप सेवा मंडळ (करावे गाव) येथे प्राथमिक शिक्षण घेतले. तर आठवी ते दहावी डी.ए. वी. पब्लिक स्कूल (नेरूळ), ११वी ते १२वी कॉमर्समध्ये केले. १३वी ते १५ वी बॅचेलर्स ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स-ओरिएंटल एज्युकेशन सोसायटी सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड टेक्नॉलॉजी येथे पूर्ण करत आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.
रितूचे वडील ३५ वर्षांपासून वृत्तपत्र वाटपाचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
लहानपणापासूनच रितू अभ्यासात हुशार होती. काहीतरी मोठे व्हायचे स्वप्न तिने उराशी बाळगले होते. या स्वप्नांना साकारण्यासाठी तिच्या आई वडीलांची तिला मोलाची साथ लाभली. याच साथीच्या जोरावर रितूने बी.कॉम. बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये ९५टक्के गुण मिळवले आहेत.