कल्याण : कल्याण-डाेंबिवली महापालिका क्षेत्रातील डोंबिवलीतील एकाचा काेराेनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समाेर आली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे वय ८२ वर्षे हाेते.
मार्च महिन्यात रुग्णाच्या मांडीच्या हाडाची शस्त्रक्रिया करण्यात आली हाेती. त्यानंतर १६ एप्रिल राेजी त्याला ताप आला. १७ एप्रिल राेजी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. १९ एप्रिल राेजी त्याला उपचार करुन घरी साेडण्यात आले हाेते. घरी गेल्यानंतर त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या वैद्यकीय अहवाला ताे काेराेना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
काेराेनाचा प्रादूर्भाव संपुष्टात आल्यानंतर पुन्हा काेराेना वाढत असताना डाेंबिवलीत एकाचा काेराेनामुळे मृत्यू झाल्याने आराेग्य यंत्रणा पुन्हा जागी झाली आहे.
काेराेनाचे आज दिवसभरात ७ रुग्ण आढळून आले आहे. आत्तापर्यंत ४१ रुग्ण आढळून आले. त्यापैकी पाच जणांना उपचार करुन घरी साेडण्यात आले आहे. उर्वरीत रुग्ण हे घरीच उपचार सुरु आहेत.