फिजिओ थेरपी का घ्यावी?

“फिजिओथेरपी” हि एक आधुनिक वैद्यकशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये दुखण्याचे मुळ कारण मुल्यांकन द्वारे (Physical diagnosis) शोधले जाते. त्यानंतर रुग्णासाठी उपचार पद्धती ठरवली जाते. त्यात मशीन ट्रीटमेंटआणि व्यायाम यांचा समावेश असतो. प्रत्येक रुग्णाची उपचार पद्धती ही वेगवेगळी असू शकते. वत्सला वेलनेस फिजिओथेरपी सेंटर मध्ये पारंपरिक पद्धती बरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर करुन सेल्युलर फिजिओथेरपी द्वारे ही उपचार केले जातात.

स्नायु आणी हाड याशिवाय फिजिओथेरपी ही अनेक ठिकाणी मदत करू शकते.

१) कोणत्याही व्यक्तीला दैनंदिन जीवनातील हालचाली ला जर काही अडचण येत असेल तर त्या व्यक्तीने फिजिओथेरपिस्टची भेट घेणे अत्यावश्यक आहे कारण वेळेत घातलेला एक टाका बाकीचे नऊ टाके वाचवतो.

२) अर्धांगवायू (पॅरालिसिस), मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर, पार्किन्सन्स, मल्टीस्क्लेरोइस या आजारात ही फिजिओथेरपीचा खुप फायदा होतो.

३) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी काही त्रास, बायपास सर्जरी नंतर, कोणतीही हृदय शस्त्रक्रिया, हृदयविकाराचा पुनर्वसन, दमा, सीओपीडी, कोविड-19, आयएलडी आणि तत्सम फुफ्फुसाचे आजार यात फिजिओथेरपिस्ट आपली मदत करू शकतात.

४) स्पोर्ट्स फिजिओथेरपी – सर्व खेळाडू ऑन आणि ऑफ फील्डमध्ये त्यांच्या योग्य शारीरीक तंदुरुस्तीसाठी फिजिओथेरपिस्टची मदत घेतात.

५) जेरियाट्रिक्स फिजिओथेरपी ( वयाशी संबंधित, जसे की कोणत्याही प्रकारची वेदना, संतुलन आणि समन्वय समस्या).

६) महिलांचे आरोग्य – मासिक पाळीच्या सुरवातीपासुन ते रजोनिवृत्तीपर्यंत, गर्भधारणेपूर्वी, गर्भधारणेत तसेच प्रसूतीनंतर.

फिजिओथेरपी च्या उपचार पद्धती या प्रामुख्याने दोन भागात विभागल्या जातात. एक मशीन ट्रीटमेंट आणि दुसरे व्यायाम. या बद्दल जाणुन घेऊ यात पुढच्या भागात.

डॉ स्मृती विशाल सोरटे (PT)
गोल्ड मेडलिस्ट (केईएम, मुंबई)
15 वर्षांचा अनुभव
वत्सला वेलनेस फिजिओथेरपी क्लिनिक
शाखा – राम मारुती रोड आणि घोडबंदर रोड
For Appointment – 9136848095 / 9136941509