सु-संस्कारीत जीवन

‘’लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, जसा वळवावा तसा वळतो’’ म्हणूनच त्यास उत्तम आकार देऊन त्याचे जीवन समृद्ध करण्याचे पालक व गुरूंचे काम असते. आई-वडील त्या मुलावर उत्तमोत्तम संस्कार करतात, ज्याप्रमाणे कुंभार चाक फिरवून चिकण मातीच्या गोळ्याला वेगळ्यावेगळ्या प्रकारचे आकार देऊन भांडी बनवून इतरांची गरज भागवून स्वतःचा देखील तो संसार उत्तमरीत्या करू शकतो. अनुभवाचे कुंभाराचे ते कसब असते आणि तीच गोष्ट सुवर्णकाराची – [सोनार], नुसत्या मातीला, दगडाला, लाकडाच्या, ओंडक्याला बाजारात तसा कितीचा असा भाव मिळणार ? पण त्यावर उत्तम संस्कार घडवून त्यावरील उत्तम उत्तम कोरीव काम व आकार दिल्याने [संस्कार] मूळ पदार्थाचे मूळ स्वरूपात बदलून जाते. कसब दाखवून मुळ गोष्टींवर संस्कार करून बाजारात मूळ वस्तूंची किंमत क्वचितच वाढते. इतका संस्काराचा मोठा परिणाम दिसून येतो. 

 
हीच संस्काराची गोष्ट थोर समाजसेवक व तत्ववेता लिओ स्टोय (sir leo tolostoy) यांनी एका खेडुताला सांगितलं, त्याचे समाधान केले. त्याचे असे झाले की एकदा सर लिओ स्वस्थ बसलेले असताना एक खेडूत त्यांच्याकडे आला व म्हणाला, ‘’महाशय जीवनात संस्काराचे महत्त्व कोणते हो ? त्या खेडूतला समजेल अशा कोणत्या प्रकाराने सांगावे असा विचार करीत असताना त्यांना समोर एक लोखंडाचा तुकडा दिसला. तो त्यांनी हाती घेतला व प्रश्न कर्त्याला म्हणाले, ‘’पहा, ह्या छोट्याशा लोखंडी तुकड्याला तशी फारशी किंमत येणार नाही परंतु या तुकड्यावर प्रक्रिया करून एखाद्या यंत्राचा सुटा भाग बनविला गेला तर त्याची चांगली किंमत येऊ शकते, हे खरे ना ! ही गोष्ट जशी लोखंडाच्या तुकड्याची, तीच आपल्या जीवनातील गोष्टींची आहे, म्हणूनच उत्तम संस्कार व्यक्तीवर घडू शकले तर असतो सद्गुणी  होऊन अनेक कला त्यास आत्मसात होत असतात व त्याच्या जोरावर साक्षात लक्ष्मी त्याच्या घरी पाणी भरते.’’ किती अर्थपूर्ण आहेत हे विचार व मार्गदर्शन. माणूस ज्या संगतीत वाढतो त्यावरून त्याचे व्यक्तिमत्व समाजात ओळखले जाते. इंग्रजीत सर्वसाधारणपणे सुरेख एक वाक्य बोलले जाते ‘’a man is known by the company he keeps.’’ सत्संग माणसाला जसे सुधारू शकते तसे बिघडवू देखील शकते. कुसंगत त्याचा पूर्ण नाश करते. करंडीतील कुचका आंबा वेळीच पूर्ण बाजूला केला नाही तर सारे आंबेच खराब होतील. हे सर्व परिचितच आहे. त्यासाठीच उत्तम संस्काराची अपेक्षा करताना वस्त्र / व्यक्तीमत्व ईत्यादीला लागलेला काळा धब्बा वेळीच दूर व्हायला हवा. त्यामुळे चंगळ वाद, बदलती जीवनशैलीची धरलेली कास व प्रचंड लोभ. विनाशकारी आकर्षण इत्यादींमुळे ती व्यक्ती फारच लवकर बिघडत जाते. कारण वाईट गोष्टी त्वरित मन आत्मसात करीत असते. पण चांगल्या गोष्टी समजून घेण्यास फार वेळ लागतो या संस्काराचे उत्तम उदाहरण देता येईल. 
 
डॉक्टर व गुंडांच्या कार्यातून वास्तविक पाहता दोघेही हाडामांसाचे, विचारांचे, दोन हातापायांचे, स्वतंत्र जीव असतात. दोघांचाही आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी ते शस्त्रहाती घेत असतात. दोघेही त्यांच्या कामात पारंगत असतात. दोघांनी आपापली कला हस्तगत करण्यासाठी काही कालावधी घालवलेला असतो. दोघांच्याही परिणामांसाठी समोर अन्य जीव असावा लागतो हे जरी खरे असले तरी संस्कार हा घटक दोघांचे व्यक्तिमत्व बदलत असतो. डॉक्टर आपल्या हातातील शस्त्राने रुग्णाचा जीव वाचवितो. शस्त्रक्रिया करून अवयवातील अशुद्ध / खराब भाग काढून टाकतो व रुग्णाचे जीवन वर्धित करून त्यास जीवनदान देत असतो. पण गुंड आपल्या हातातील शस्त्राने चांगल्या व्यक्तीवर हल्ला करून त्याचा निघृणपणे जीव घेतो. एखाद्याचा जीव वाचवणे व जीव घेणे या दोन्ही क्रिया जीवाशी संबंधित असल्या तरी त्याचे परिणाम मात्र टोकाचे आहेत. हे संसाराचे परिणाम आहेत, हेच व्यक्तीचे पूर्ण जीवन बदलून टाकतात उत्तम संस्कारी जीवन जगण्यासाठी निष्ठा, प्रेम, जिव्हाळा, सत्संग, हवा असतो. उत्तम संसारी बनण्यासाठी प्रत्येकाने आज उत्तम संस्कारी बनणे आवश्यक आहे हेच त्याच्या यशाची जीवनाचे इंगित आहे असे म्हंटले तर अजिबात वावगे ठरू नये. 
 
रामकृष्ण विनायक अभ्यंकर,
२/४६ भक्तियोग सोसा. परांजपे नगर ,
वझिरा नका, बोरीवली प. 
मुंबई ४०००९१.
मोबा ९८१९८४४७१०