सोमवारी नौपाडा-कोपरी परिसरात पाणीपुरवठा बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील कोपरी आनंदनगर येथील बीएमसी विभागामार्फत करण्यात आलेल्या जलवाहिनीवर बायपास यंत्रणा कार्यान्वित तसेच जोडणी करणेचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या कामामुळे नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील काही भागांचा पाणीपुरवठा सोमवार 15 जुलै सकाळी 10 ते सायंकाळी 10पर्यंत एकूण 12 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

शटडाऊन कालावधीत कोपरी आनंदनगर, गांधीनगर, केदारेश्वर मंदिर परिसर, हनुमान व्यायाम शाळा परिसरातील पाणीपुरवठा 12 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नोंद घ्यावी. तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.