केवळ तरुणांनाच नाही तर ज्येष्ठांनाही भुरळ घालतय ठाण्यातील वॅफल्स

हल्ली तरुणाईला नवनवीन पदार्थ ट्राय करायला जास्त आवडतात. बेल्जियम वॅफल्स हे त्यापैकीच एक. हे अमेरिकन वॅफल्सपेक्षा lighter batter, मोठे चौरस आणि खोल खिसे असलेले विविध प्रकारचे वॅफल आहेत. बेल्जियन वॅफल्स यीस्टचा वापर करून बनवले जातात, परंतु आता बेकिंग पावडरचा वापरही केला जातो. ते सहसा न्याहरी म्हणून खाल्ले जातात. हे सर्व्ह करण्यासाठी टॉपिंग्ज, व्हीप्ड क्रीम, कन्फेक्शनर्स शुगर, सॉफ्ट फ्रूट आणि चॉकलेट स्प्रेडपासून सिरप आणि बटर किंवा मार्जरीनचा वापर केला जातो. वरून व्हॅनिला आइस्क्रीम आणि ताजी फळे (जसे की स्ट्रॉबेरी) मिष्टान्न म्हणून दिली जातात.

जुन्या ग्रीसमधील वॅफल हा फ्लॅट केकचा मूलभूत प्रकार होता, जो दोन धातूच्या प्लेट्समध्ये केक बेक करून तयार केला जात असे. हे वॅफल म्हणजे खमीर पिठात किंवा कणकेपासून बनवलेले डिश जे दोन प्लेट्समध्ये शिजवले जाते. वॅफल्स जगभर खाल्ले जातात, विशेषतः बेल्जियममध्ये हा पदार्थ प्रसिद्ध आहे. व्यावसायिकरित्या शिजवलेले आणि गोठवल्यानंतर वॅफल्स ताजे किंवा फक्त गरम केले जाऊ शकतात.

व्हाट्टा वॅफल

वॅफल हा तरुणाईत अतिशय प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. ठाण्यातील व्हाट्टा वॅफल हे हिरानंदानी परिसरातील प्रसिद्ध स्पॉट आहे. हे दुकान ५ मार्च २०१७ पासून सूरु झाले आहे. हे दुकान बाराही महिने सुरु असते व वॅफल खाण्यासाठी नेहमीच येथे ठाणेकरांची गर्दी दिसते. त्याचबरोबर येथे मिळणाऱ्या वॅफलची किंमत ही पॉकेट फ्रेंडली आहे. ८९ रुपयांपासून येथे वॅफलच्या किमती सुरु होतात. व्हाट्टा वॅफल मध्ये १९० पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचे वॅफल्स उपलब्ध आहेत. तसेच येथील टॉप सेलिंग्स वॅफल्स मध्ये ट्रिपल चॉकलेट, ब्राउनी नटेलचा समावेश आहे.

पत्ता : शॉप न ३ दमयंती बसस्टॉप, आकाश मंडप गेट समोर, वुफनगुफ पेट केअर रिसॉर्ट, हिरानंदानी इस्टेट, ठाणे पश्चिम

——

Mario Donut and waffles

Mario Donut and waffles हे शॉप ठाण्यात १० एप्रिल २०२२ पासून सुरू झाले. वॅफल्स हा काहीतरी नवीन प्रकार असल्यामुळे आणि पाककलेची आवड असल्यामुळे या शॉपची सुरुवात केली. वॅफल्स हा एक चॉकलेटचा प्रकार आहे आणि Mario Donut and waffles येथे ३० वेगवेगळे फ्लेवर्स उपलब्ध आहेत. इतर ठिकाणी जसे वॅफल्स हे मैद्याचा वापर करून बनवतात तसे Mario Donut and waffles येथे या मल्टिग्रेन प्रेमिक्सचा वापर करून वॅफल्स बनवले जातात. ठाणेकरांच्या या Mario Donut and waffles ला खूप चांगला प्रतिसाद आहे. अगदी छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत या वॅफल्सची क्रेज आहे. अगदी रिझनेबल दरात तुम्हाला Mario Donut and waffles मध्ये वॅफल्सचा आस्वाद घेता येईल.

पत्ता : धर्मवीर नगर, वसंत विहार, ठाणे पश्चिम ४००६१०

—–

 

 

द वॅफल्स बाईट 

सध्या मार्केटमध्ये वॅफल्सची क्रेझ आहे. लोकांना विविध फ्लेव्हरचे वॅफल्स खायला आवडतात. ठाण्यातील द वॅफल्स बाईट हे असेच नवीन नवीन फ्लेव्हरच्या वॅफल्ससाठी प्रसिद्ध आहे. २०२२ मध्ये सुरु झालेल्या द वॅफल्स बाईटमध्ये बाराही महिने वॅफल्सचा आस्वाद खवय्यांना घेता येतो. येथे २० पेक्षा जास्त प्रकारचे वॅफल्स उपलब्ध आहेत. खवय्ये फक्त ५० रुपयांपासून इथे वॅफल्सची चव घेऊ शकतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची येथे वॅफल्स खाण्यासाठी गर्दी असते.

पत्ता : द वॅफल्स बाईट, सुकुर पार्क, प्रशांत कॉर्नर जवळ, मनीषा नगर, कळवा, ठाणे, ४००६०५