युएई आणि नेपाळ करणार महिला टी-२० आशिया चषकाची सुरुवात

महिला आशिया चषक स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीला श्रीलंकेत १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

अ गट: यूएई, नेपाळ, भारत, पाकिस्तान

ब गट: थायलंड, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया

महिला आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना शुक्रवारी युएई आणि नेपाळ यांच्यात रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.

 

आमने-सामने

एकमेकांविरुद्ध खेळताना युएईने एक तर नेपाळने दोन टी-२० सामने जिंकले आहेत.

 

संघ

युएई: ईशा ओझा (कर्णधार), कविशा कुमारी, रिथिका रजिथ, समायरा धरणीधारका, लावण्या केनी, एमिली थॉमस, हीना होटचंदानी, मेहक ठाकूर, इंधुजा नंदकुमार, रिनिथा रजिथ, खुशी शर्मा, रिषीथा रजिथ, सुरक्षा कोट्टे, तीर्था सतीश, वैष्णवी महेश.

नेपाळ: इंदू बर्मा (कर्णधार), काजोल श्रेष्ठा, रुबीना छेत्री, सबनम राय, सीता राणा मगर, राजमती आयरी, पूजा महतो, बिंदू रावल, रोमा थापा, ममता चौधरी, कबिता जोशी, कबिता कुंवर, डॉली भट्टा, कृतिका मरासिनी, समझाना खडका

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

ईशा ओझा: यूएईची कर्णधार ही अलीकडच्या काळात संघासाठी सर्वात प्रभावी फलंदाजांपैकी एक आहे. या २६ वर्षीय उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने तिच्या शेवटच्या १० आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये, ५७च्या सरासरीने आणि १२२च्या स्ट्राइक रेटने ४०२ धावा केल्या. नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत, ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. या स्पर्धेत तिने पाच डावात १८९ धावा केल्या.

वैष्णवी महेश: या यूएई मधील चतुर लेग स्पिनरने ६३ आंतरराष्ट्रीय टी-२० डावात ८२ विकेट्स घेतल्या आहेत. १७ वर्षांची ही खेळाडू तिच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. असामान्य उपजत क्षमता असलेल्या या खेळाडूने वयाच्या १२व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

रुबिना छेत्री: महिलांच्या आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती नेपाळची एकमेव फलंदाज आहे. या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने फेब्रुवारी २०२४मध्ये मलेशियाविरुद्ध आशियाई क्रिकेट काउंसिलच्या महिला प्रीमियर चषक स्पर्धेत हा पराक्रम गाजवला. एकूण ४६ टी-२० डावात तिने २५च्या सरासरीने ७४१ धावा केल्या आहेत. तिच्या फलंदाजीसोबतच ती उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाजी करते. ५३ डावात तिने ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

पूजा महतो: नेपाळच्या या १८ वर्षीय उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची चांगली सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, तिने १७ टी-२०मध्ये ३.६च्या इकॉनॉमीने १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर बॅटने तिने ११ डावांमध्ये १५१ धावा केल्या आहेत, ज्यात तिची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ५९ आहे.

 

खेळपट्टी

या ठिकाणी आतापर्यंत तीन महिला टी-२० सामने खेळले गेले आहेत. ते तिन्ही सामने २०२२मध्ये झाले होते. धावांचा पाठलाग करताना संघांनी तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. येथे सर्वाधिक धावसंख्या १४१ आहे तर सर्वात कमी १०४ आहे. या स्पर्धेसाठी ताजी खेळपट्टी वापरणे अपेक्षित असल्याने फलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल असू शकते.

 

हवामान

हवामान ढगाळ (१००% ढगांचे आच्छादन) आणि हवेशीर असेल. परिसरात काही ठिकाणी गडगडाट होऊ शकतो. पावसाची ४०% शक्यता आहे. तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: १९ जुलै, २०२४

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डंबुला

प्रसारण: डिस्नी + हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स