दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना आजपासून सुरुवात

पंतप्रधान मुंबईतून झेंडा दाखवणार

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी, 10 फेब्रुवारी 23 रोजी छशिमट येथून मुंबई – साईनगर  शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या नियमित सेवेची सुरुवात होणार आहे.

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस गाडी क्र. 22223 मुंबई- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास छशिमटहून 12 फेब्रुवारीपासून रोज (मंगळवार वगळता) 06.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.40 वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल. ट्रेन क्र. 22224 साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस साईनगर शिर्डी 11 फेब्रुवारी 23पासून दररोज (मंगळवार वगळता) सायंकाळी 17.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 22.50 वाजता मुंबईला पोहोचेल. दादर, ठाणे आणि नाशिकरोड हे थांबे असतील.

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन क्र. 22225 मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस मुंबई येथून 11 फेब्रुवारी 23 पासून रोज (बुधवार वगळता) सायंकाळी 16.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22.40 वाजता सोलापूरला पोहोचेल.
गाडी क्र. 22226 सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस 11 फेब्रुवारी 23 पासून रोज (गुरुवार वगळता) सोलापूरहून सायंकाळी 06.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.35 वाजता छशिमट मुंबई येथे पोहोचेल. दादर, कल्याण, पुणे आणि कुडुर्वाडी हे थांबे असतील.

ट्रेन क्र. 22223/22224 आणि ट्रेन क्र. 22225/22226 चे बुकिंग 10 फेब्रुवारी 23 रोजी सर्व काउंटरवर आणि संकेतस्थळावर सुरू होईल. वंदे भारतच्या गाड्यांच्या वेळेसाठी एनटीईएस अ‍ॅप डाऊनलोड करा किंवा इंडियनरेल्वे.जीओव्ही.इन ला भेट द्या, असे मध्य रेल्वेचे आवाहन आहे.