भाईंदर: भाईंदर येथील आपल्या फॅक्टरीतून सुमारे २५ लाखांचा सोन्याचा ऐवज हातातील बॅगेतून घेऊन भाईंदर रेल्वे स्थानकाकडे जात असलेल्या बाळकृष्ण अबगुल यांना दोन अज्ञात इसमांनी अडवून बोलण्यात गुंतवले. तसेच त्यांच्या हातातील बॅगतील सोन्याचा ऐवज काढून घेऊन रिक्षाने पळाले.
याबाबत भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अवघ्या काही दिवसांतच भाईंदर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी करून दोन्ही आरोपींना अटक करून ३०० ग्रॅम सोने जप्त केले आहे. ठाणे न्यायालयाने दोन्ही आरोपींना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
भाईंदर पश्चिम येथील अभयभाई जैन यांचे रुबीना अकॅडमी स्कुल मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या फॅक्टरीतुन भाईंदर स्टेशनकडे २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ३.३० वाजता घेऊन जात असताना अशोकराज टिव्ही शोरुमसमोर अनोळखी आरोपीतांनी आपसात संगनमत करुन, फिर्यादी यांचेकडील बॅग हिसकावली. तसेच बॅगेतील सोन्याची लगड, तुकडे, बिस्कीट असलेली पुडी काढुन घेऊन रिक्षाने पळून गेले. याबाबत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.