कल्याण-डोंबिवलीचा ‘कायापालट’

२० हजार होर्डिंग्ज, बॅनर, झेंडे हटवले

कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतील कायापालट अभियानांतर्गत शहराला विद्रुप करणाऱ्या झेंडे, बेकायदा होर्डिंग्ज, बॅनर्सना हटवण्यात येत असून दोन वर्षांत २० हजार साहित्य काढून टाकण्यात आले आहे.

शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणारे अनधिकृत होर्डिंग्ज,बॅनर्स, पोस्टर्स निष्कासित करणेबाबत निर्देश आयुक्तांनी सर्व प्रभागाच्या सहायक आयुक्तांना दिले होते. त्याअनुषंगाने गेल्या दोन वर्षात महापालिकेच्या अ प्रभागात 448, ब प्रभागात एकुण 8284, क प्रभागात 2478, जे प्रभागात 723, ड प्रभागात 3412, फ प्रभागात 1264, ह प्रभागात 1731, ग प्रभागात 111, आय प्रभागात 261 आणि ई प्रभागात 1036 असे एकुण 19,748 होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स आणि झेंडे निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार आहे.