ठाणे: येथील ‘एफडीए’च्या मोहिमांच्या दरम्यान विविध खाद्यपदार्थांचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.
भेसळीच्या संशयावरून अन्न आणि औषध प्रशासन कोकण विभागाच्या ठाणे कार्यालयाने खवा, पनीर, स्वीट, मावा, तूप, बटर, नमकीन, फरसाण, घी-वनस्पती, तेल, मिठाई आदी अन्नपदार्थांचा एकूण 11 लाख 4,740 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे तसेच मसाले, सुकामेवा, रवा, आटा, मैदा, बेसन, स्किम मिल्क पावडर, चीज, काबोर्नेटेड बेवरेजेस इत्यादी अन्नपदार्थांचा एकूण तब्बल तीन कोटी 51 लाख 223 रु. किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न आणि औषध प्रशासन कोकण विभाग ठाणे यांच्यामार्फत सणासुदीच्या काळात धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. अन्नपदार्थांचे एकूण 195 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत.