विमानाने येऊन ‘त्यांनी’ बजावला मतदानाचा हक्क

नवी मुंबई: देशाच्या कानाकोपऱ्यात आणि देशाबाहेर नोकरी-व्यवसायानिमित्त राहत असलेल्या मतदारांनी धावपळ करत नवी मुंबईत येऊन मतदानाचा हक्क बजावला.

राज कोठारी आणि सुचिता कोठारी हे मागील तीन महिने दुबईला होते. त्यांना मतदानाची तारीख समजताच त्यांनी ताबडतोब दुबईहून तिकीट बुक केले आणि संध्याकाळी ५.५५ ला सगळ्यात शेवटच्या क्षणी नेरूळमधील मतदान केंद्रावर दोघांनी मतदान केले.

किशोर ढाले हे पेट्रोलियम कंपनीत कामाला असून त्यांची गेल्या दोन महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगाल येथे बदली झालेली आहे. त्यांचे नाव येथे मतदार यादीत असल्यामुळे ते मतदान करण्यासाठी आले आणि मत देऊन पुन्हा विमानाने परत गेले.