ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जून 2022 मध्ये डेंग्यूची संशयित रुग्णसंख्या 40 आणि निश्चित निदान झालेले शून्य रुग्ण आहेत. तर मलेरियाचे 28 रुग्ण आढळून आले व चिकनगुनियाचे संशयित व निश्चित निदान केलेली रुग्णसंख्या शून्य आहेत.
यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 31427 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 307 घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण 41004 कंटेनरची तपासणी केली असता 359 कंटेनर दूषित आढळून आली.
या अनुषंगाने दरम्यानच्या कालावधीत कार्यक्षेत्रात 50 हॅण्डपंप, ट्रॅक्टर्स-10, ई रिक्षा 6, 10 बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात 2194 ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅण्डमशीनद्वारे 14765 ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली, तसेच तीन ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिताली हुमरसकर यांनी नमूद केले.