सर्वांच्याच पसंतीचे असणाऱ्या सिझलर्सची ठाण्यात भरपूर व्हरायटी

भारतीय सिझलरचा शोध १९६३ मध्ये मुंबईत फिरोज इराणी यांनी लावला आणि एक्सेलसियर सिनेमाजवळील त्यांच्या रेस्टॉरंटला “सिझलर” असे नाव दिले. सिझलर ही एक मेडले डिश आहे. सिझलर ही मूलत: सिंगल डिश जेवण असते. म्हणजेच आपण दाल राईस किंवा रोटी भाजी असे कॉम्बिनेशन खातो परंतु सिझलर बरोबर इतर कॉम्बिनेशन काही नसते. हे गरम धातूच्या प्लेटवर सर्व्ह केले जाते, जे ग्राहकाच्या टेबलवर नेल्यावर तेथील लाकडी धारकावर ठेवले जाते.

ही डिश जपानी Teppanyaki प्रेरित आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि मांस अतिशय गरम धातूच्या तव्यावर शिजवले जाते. आतून मऊ आणि ओलसर तर बाहेरून कुरकुरीत बनवतात.

“ओपन-रोस्टेड, ग्रील्ड किंवा शॅलो फ्राय केलेले मांस, चिकन, मासे किंवा भाजीपाला, पॅटी हे अंडाकृती आकाराच्या धातूवर किंवा दगडाच्या गरम प्लेटवर सर्व्ह केले जाते. सिझलर मिळणारी ठाण्यातील काही रेस्टॉरंट….

फॅमिली ट्री

पाचपाखाडी येथील सिझलर्ससाठी प्रसिद्ध असलेलं हे रेस्टॉरंट आहे. सिझलर्स हा हेल्दी व तरुणाईबरोबर सर्व वयोगटातील लोकांचा आवडीचा खाद्यपदार्थ झाला आहे. फॅमिली ट्री हे 2016 पासुन सुरु झालेले रेस्टॉरंट असून येथे व्हेज सिझलर्स उपलब्ध आहेत. सिझलर प्लेट दोन व्यक्ती पोटभरून खाऊ शकतात. फॅमिली ट्री येथे सिझलर्समध्ये मेक्सिकन सिझलर, इंडियन सिझलर, बारबिक्यू सिझलर, चायनीज सिझलर, इटालियन सिझलर, वडापाव सिझलर (इंडियन, चायनीज, मेक्सिकन, इटालियन)अशा सर्व प्रकारचे सिझलर्स उपलब्ध आहेत.

पत्ता : पाचपाखाडी, ठाणे

संपर्क : 93260 57887

———————-

थ्री बडीज् बार –

ठाण्यातील नितीन कंपनी येथे असलेले थ्री बडीज् बार येथे देखील तुम्हाला सीझलर्सचा आस्वाद घेता येईल. हे रेस्टॉरंट सिझलर्ससाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. कोविडच्या दुसऱ्या लॉकडाउननंतर थ्री बडीज् बार रेस्टॉरंट सुरू झाले. तेव्हापासून त्यांनी सिझलर हा प्रकार त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये सुरु केला. थ्री बडीज् बार येथे सिझलर्समध्ये प्रामुख्यने पनीर, चिकन, मिक्स भाज्या इ. समावेश आहे. तसेच मॅश केलेले बटाटे, मलईदार कॉर्न आणि आवडीनुसार वेगवेगळ्या सॉसेसचा समावेशही यामध्ये करता येतो. आपल्या शरीराला उपयुक्त असलेली प्रथिने, तंतू, कर्बोदके सीझलर्स मधून मिळतात. येथे चार वेगवेगळ्या प्रकारचे व्हेज सीझलर्स आणि चार प्रकारच्या नॉनव्हेज सीझलर्सचा आस्वाद ठाणेकरांना घेता येतो. त्यामुळे ठाणेकरांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते.

पत्ता : नितीन कंपनी, ठाणे

संपर्क : 7506039999

———————

पेपर फ्राय बाय कामत् स

सीझलर्स हा हेल्थी व प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. ठाण्यातील लुईसवाडी येथे असलेल्या पेपर फ्राय बाय कामतस् हे सिझलर्ससाठी प्रसिद्ध असलेले रेस्टोरंट आहे. हे एक वेगवेगळ्या प्रकारचे क्युझिन मिळणारे रेस्टोरंट असून येथे फक्त व्हेज सिझलरचा आस्वाद ठाणेकरांना घेता येईल. यात राईस, विविध प्रकारच्या भाज्या, फ्रेंच फ्राईज, सीजलिंग्स इ . समावेश आहे. सीझलर्सचा आस्वाद घेण्यासाठी ठाणेकर खवय्ये नेहमीच या ठिकाणाला पसंती देताना दिसतात. येथे मिळणारे सिझलर्स हे दोन ते तीन लोकांना पुरेसे होतात.

पत्ता : लुईसवाडी, ठाणे

संपर्क : 87795 29579