डोळ्याच्या सुरक्षेबरोबरच हटके लूकसाठी सनग्लासेसला ठाण्यात वाढती मागणी 

अनेकविध कारणांमुळे हल्ली चष्मा लावला जातो. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, स्टायलिश दिसण्यासाठी, स्क्रीनकडे बघून काम करताना त्रास होऊ नये म्हणून तसेच दिसण्याची समस्या असेल तर मग चष्मा लावला जातो. चष्म्याप्रमाणेच हल्ली सनग्लासेसचा सर्रास वापर केला जातो. उन्हातून जाताना तर सनग्लासेस महत्वाचे आहेतच. पण त्यासह काही जण चांगला लूक दिसण्यासाठी, टू व्हीलरवरून जाताना डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी देखील सनग्लासेस वापरत असतात. काही लोक प्रवास करत असताना डोळ्याच्या सुरक्षेसाठी काळ्या चष्म्याचा वापर करतात.

तीव्र उष्णतेमुळे दुपारी बाहेर पडणेही आता खरे तर मुश्किल होते. मात्र कामासाठी बाहेर पडावेच लागते. त्यावेळी आपल्या डोळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. 21 प्रकारचे सनग्लासेस सध्याच्या काळात बाजारात उपलब्ध असल्याचे समजते. चांगल्या क्वालिटीचे सनग्लासेस मिळण्याची ठाण्यातील काही

नारकर ऑप्टिशियन

कळवा येथे असणऱ्या नारकर ऑप्टिशियनमध्ये विविध प्रकारचे सनग्लासेस उपलब्ध आहेत. नवीन जनरेशनच्या आवडीनुसार बिग स्क्वेअर फ्रेम्स आणि बिग कॅट फ्रेम्स देखील येथे उपलब्ध आहेत. नवीन ट्रेंडनुसार रेक्टँगल फ्रेम, स्क्वेअर फ्रेम आणि स्पोर्टस् आय वेअर येथे उपलब्ध आहेत. येथे असलेल्या सनग्लासेसची रेंज २५०/-पासून सुरु आहे. आपण सनग्लासेस दिवसभर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वापरू शकतो. सनग्लासेस वापरताना दोन्ही हाताने साईड पकडून घालावेत व दोन्ही साईड पकडून काढावेत. गॉगल कधीच एका हाताने खेचू नये. तसेच कोणत्याही कपड्याने सनग्लासेस पुसू नये. मायक्रोफायबर कपड्याने हलक्या हातानेच क्लीन करावा. बाईक रायडर्ससाठी स्पोर्टी सनग्लास आणि रात्रीच्या प्रवासासाठी ट्राई गॉगल्स वापरू शकता.

पत्ता : आनंद विहार, कळवा, ठाणे

संपर्क : 86898 43780
===================

LensX (लेन्स एक्स)

वसंत विहार येथील LensX या दुकानात आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स पाहायला मिळतील. येथे लेडीजसाठी कॅट फ्रेम्स आणि रेक्टँग्युलर फ्रेम्स आहेत तर जेंट्ससाठी रेबन कंपनीचे नवीन यूव्ही प्रोटेक्शन फ्रेम्स आहेत. तसेच नवीन जनरेशनसाठी मॅट फिनिशिंग फ्रेम्स आणि ट्रान्स्परन्ट फ्रेम्समध्ये वेगवेगळ्या रंगाचे ग्लास (ब्लॅक, ग्रीन, ब्लू, ब्राऊन, पिंक) उपलब्ध आहेत. येथे उपलब्ध असलेले गॉगल्स १००० रुपयांपासून सुरु आहेत. पिवळ्या रंगाचे ग्लास गॉगल्स रात्रीच्या वेळेस वापरले पाहिजेत तर ड्रायव्हिंग करताना देखील हे गॉगल्स वापरले जातात. ग्रे गॉगल्स हे स्पोर्ट्ससाठी वापरले जातात. कोणीही कधीही एकमेकांचे गॉगल्स वापरू नयेत. सनग्लासेस वापरण्याआधी नेहमी सुक्या कपड्याने पुसून नंतर वापरावे आणि वापरून झाल्यानंतर ते नीट केसमध्ये ठेवावेत.

पत्ता : आम्रपाली आर्केड, वसंत विहार, ठाणे

संपर्क : 8291772636
=====================
Optica Scientific Opticians

ठाण्यातील Optica Scientific Opticians येथे सनग्लासेसमध्ये वेगवेगळ्या फ्रेम उपलब्ध आहेत. मालिका, चित्रपटातील कलाकारांप्रमाणे फॅशन करण्याची सगळ्यांची हौस असते. नवीन जनरेशनसाठी विविध ट्रेंड सध्या आहेत. सनग्लासेसची किंमत ८५० पासून ते ८००० रुपयापर्यंत आहे. लोकल सनग्लासेस ८५० रुपयांपासून २००० पर्यंत आहेत. यात खूप विविधता आहे. बऱ्याचदा ग्राहक एक विशिष्ट ब्रँड शोधून खरेदीला येतात. डोळे संपूर्ण झाकले जातील असे सनग्लासेस वापरावे. ज्यांना चष्म्याचा नंबर असतो त्यांनी नंबर तपासून त्यानुसार सनग्लासेस वापरावे. उन्हात बाहेर जाताना सनग्लासेसचा वापर केलाच पाहिजे. त्यामुळे डोळ्यांना उन्हाचा त्रास कमी संभावतो. सनग्लासेस स्वच्छ करताना पाण्यात धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यावेत. बाईक रायडरसाठी नाईट फिजनचे सनग्लासेस येतात. ते पूर्ण पिवळ्या रंगाचे असतात. कुठलाही चश्मा किंवा सनग्लासेस वापरून झाल्यावर केसमध्ये ठेवा.

पत्ता : अभिवादन बिल्डिंग, छ. शिवाजी पथ, ठाणे रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम

संपर्क : 91522 84858

आपण नक्की कोणत्या प्रकारचा गॉगल वापरावा, कसा वापरावा याबाबत तेथील तज्ज्ञांनी काही माहिती दिली. यावेळी गोल आकाराच्या चेहऱ्यासाठी डीप फ्रेम असलेले गॉगल्स खुलून दिसतात असे त्यांनी सांगितले. रेक्टँगल शेप असलेली फ्रेम देखील शोभून दिसते. अंडाकृती आकाराच्या चेहऱ्यावर लहान किंवा मोठ्या दोन्ही प्रकारचे गॉगल्स छान दिसतात. ऑब लॉंग चेहरा हा अंडाकृती आकारापेक्षा मोठा असतो. त्यांचे नाक थोडे लांब असते त्यामुळे डीप फ्रेम गॉगल्स त्यांना छान दिसतात. त्रिकोणी चेहऱ्यासाठी कॅट आय गॉगल छान दिसतो. डायमंड आकाराच्या चेहऱ्यासाठी ब्रो लाईन गॉगल्स छान दिसतात.