बदलापूर एमआयडीसीतील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार

१२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरूवात

बदलापूर: बदलापूर पूर्वेकडील औद्योगिक परिसरातील भुयारी गटार योजनेच्या १२८ रुपयांच्या कामाचा शुभारंभ आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झाला. या भुयारी गटार योजनेमुळे एमआयडीसीतील कंपन्यांमधून सोडलेल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

बदलापूरला एमआयडीसी भागातील सांडपाण्याची पाईपलाईन जुनी झाल्यामुळे ती पाईपलाईन वारंवार फुटत होती. त्यामुळे बदलापूरकरांना रसायनमिश्रित सांडपाण्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. जुनी लाईन फुटल्यामुळे उल्हास नदीचे पाणीही दुषित होण्याचे प्रकारात वाढ झाली होती. मात्र नव्या भुयारी गटारी योजनेमुळे जलप्रदूषण थांबेल, असा विश्वास आमदार कथोरे यांनी व्यक्त केला. या भुयारी गटार योजनेसाठी 128 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भुयारी गटार योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी भाजपचे गटनेते राजन घोरपडे, माजी नगरसेवक राजन धुळे, रमेश सोळसे, विष्णू गडगे, गजेंद्र गडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.