ठाणे : डोंबिवली पूर्व येथील 18 लाख ५० हजार रुपये किमतीचे २२ तोळे सोन्याचे दागिने गहाळ झाले होते. डोेंंबिवली पूर्व पोलिसांनी शोध घेत सर्व दागिने मालकाला परत दिल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
1 जानेवारी 2025 रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास डोंबिवली पोलीस ठाणे येथे अश्विनी किर्पेकर, (४७) या येथे बी-४, १०१, एमआयडीसी फेस २ डोंबिवली पूर्व येथे राहतात. त्या गणपती मंदिर मानपाडा ते डोंबिवली रेल्वे स्टेशन असे रिक्षातून प्रवास करत होत्या. प्रवासात त्यांची बॅग रिक्षामध्ये राहून गेली. बॅगेमध्ये साडे अठरा लाख रुपये किमतीचे सोन्याचे 22 तोळे 400 मिली वजनाचे दागिने तसेच कपडे असल्याचे होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ डोंबिवली पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वाघमोडे, पोलिस अंमलदार मंगेश वीर यांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कक्षातून हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि रिक्षाचा शोध घेऊन व रिक्षा मालकाचाही पत्ता शोधून, त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर श्री. जवादवाड यांच्या हस्ते तक्रारदार यांना त्यांचा ऐवज परत मिळवून दिला.
तक्रारदार यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे मनापासून खूप आभार मानले आहेत. पोलिसांच्या या तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत नागरिकांकडूनही पोलिसांचे कौतूक होत आहे.