डोंबिवलीकरांना घडली शिवकाळाची सफर

Thanevaibhav Online

7 October 2023

डोंबिवली : माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली (मॅड) आयोजित आणि रोटरी क्लब ऑफ न्यू डोंबिवली व सफायर बँक्वेट यांच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेल्या “साहस” शिवकालीन दुर्ग – शस्त्र प्रदर्शनानिमित्त डोंबिवलीकरांना छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य काळाची सफर घडली.

या प्रदर्शनात “सिंधुदुर्ग व विजयदुर्ग ” या किल्ल्यांच्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे तयार केलेल्या प्रमाणबद्ध प्रतिकृती व शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाणी, तोफ-गोळे, मोडी-लिपीतील कागदपत्रे, पारंपरिक बैठे खेळ तसेच सह्याद्री भ्रमण व गिर्यारोहण विषयी साधने, पुस्तके, माहितीपट अशा भरगच्च कार्यक्रमाचा अनुभव डोंबिवलीकरांना घेता आला.

सफायर बँक्वेट हॉल, तिसरा मजला, पी.पी.चेंबर्स, शहीद भगतसिंग रोड, डोंबिवली पूर्व येथे हे “साहस” प्रदर्शन सर्वांना विनामूल्य पाहता आले. पहिल्या नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्व करणारे ऋषिकेश यादव, एव्हरेस्ट वीर संतोष दगडे या मान्यवर गिर्यारोहकांच्या आणि रोटरी 3142 चे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते या ‘साहस’ शिबिराचा उद्‌घाटन सोहळा झाला.

या प्रदर्शनासाठी माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली (मॅड) सह अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, सफायर बँक्वेट हॉल, रोटरी क्लब ऑफ न्यू डोंबिवली, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउनटाउन, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजेन्सी, रोटरी क्लब ऑफ रिजेन्सी इस्टेट, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स, रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे व रोटारक्ट क्लब ऑफ न्यू डोंबिवली अशा अनेक संस्थांचे सहकार्य लाभले.

प्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला व वीस हजाराहून अधिक लोकांनी तीन दिवसात ह्या प्रदर्शनाचा लाभ घेतला. डोंबिवलीतील नागरिक, शाळेतील विद्यार्थी व समाजातील अनेक मान्यवरांनी प्रदर्शनास भेट देऊन त्याचे कौतुकही केले.