डोंबिवली शहर आणि महायुतीचा वैचारिक डीएनए एकच

रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला दणदणीत विजयाचा विश्वास

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी डोंबिवलीकरांचा चव्हाण यांना असलेला उदंड प्रतिसाद दिसून आला.

मंगळवारी सकाळी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिरासह डोंबिवलीतील विविध देवस्थानांचे रविंद्र चव्हाण यांनी मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर डोंबिवली पश्चिम येथील सम्राट हॉटेलजवळच्या भाजपा कार्यालयातून रविंद्र चव्हाण यांच्या समर्थनार्थ भव्य नामांकन रॅली काढण्यात आली. यावेळी डोंबिवलीतील आगरी समाज, जैन समाज, व्यापारी महामंडळ, लेवा समाज, दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय समाज तसेच शहरातील युवा मोर्चाचे सर्व प्रतिनिधी आणि डोंबिवलीकर नागरिकांनी तुडुंब गर्दी करून चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.

“डोंबिवली शहर आणि भाजपा महायुतीचा वैचारिक डीएनए एकच आहे, त्यामुळे यंदाही डोंबिवलीकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास आहे. गेल्या २०-२५ वर्षांत एक सच्चा डोंबिवलीकर म्हणून शहराच्या प्रगती आणि उन्नतीसाठी अविरत प्रयत्न करत आलो आहे. यापुढेही ‘डोंबिवली फर्स्ट’ या उद्दिष्टाने सदैव कार्यरत राहीन हे वचन देतो.” असं रविंद्र चव्हाण म्हणाले आहेत.

यावेळी त्यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये विधानसभा संघटक आणि ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी मंत्री मार्गदर्शक जगन्नाथ पाटील, शशिकांत कांबळे, मंदार हळबे, विकास म्हात्रे, साई शेलार, जनार्दन म्हात्रे, विश्वनाथ राणे, निलेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर, खुशबू चौधरी, मितेश पेणकर, मंदार टावरे, विश्वदीप पवार, शैलेश धात्रक, राजेश म्हात्रे, रविसिंग ठाकूर, दिनेश दुबे इत्यादींचा सहभाग होते.