घरात आई अन् मुलाचा आढळला मृतदेह

मुंबई: नवी मुंबईतील कामोठ्यातील एका इमारतीच्या घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला होता. घरातील दोन्ही मृतांची हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला होता. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण आहेत.

नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज अपार्टमेन्टमध्ये दोन मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा घरातील एलपीजी गॅस लिक असल्याचे आढळलून आले होते. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले होते. ही घटना हत्या की आत्महत्येची आहे, याचा शोध पोलीस घेत होते. पोलिसांकडून सोसायटीचे सीसीटीव्ही पाहण्यास सुरवात करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. क्राईम ब्रांचकडून आरोपींची चौकशी सुरू आहे. गिता जग्गी (70) आणि जितेंद्र जग्गी (45) यांची काल हत्या झाली होती. कामोठे सेक्टर 6 येथील ड्रीम्ज सोसायटीमधील राहत्या घरात दोघांचे मृतदेह काल रात्री आढळून आले होते. चोरीच्या उद्देशाने की इतर कोणत्या कारणातून हत्या झाली आहे, याची चौकशी सुरू झाली आहे.