ठाणेकरांना कोरियन फुडची भुरळ

जगभरात सध्या कोरियन ट्रेंड खूपच गाजत आहे. कोरियन पाककृती शतकानुशतके बदलातून विकसित झाली आहे. कोरियन पाककृती मुख्यत्वे तांदूळ, भाज्या, सीफूड आणि (किमान दक्षिण कोरियामध्ये) मांसावर आधारित आहे. पारंपारिक कोरियन जेवणाला वाफेवर शिजवलेल्या लहान-धान्याच्या तांदळाच्या साईड डिशची नावे दिली जातात. सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये तिळाचे तेल, डोएनजांग (आंबवलेले बीन पेस्ट), सोया सॉस, मीठ, लसूण, आले, गोचुगारू (मिरपूड फ्लेक्स), गोचुजंग (लाल मिरची पेस्ट) आणि नापा कोबी यांचा समावेश होतो. तुम्हाला पण कोरियन फूडचा आस्वाद घ्यायचा असेल तर ठाण्यातील या रेस्टॉरंट्सला नक्की भेट द्या.

थाई ची एशियन क्युसिन

ठाणे शहरातील थाई ची एशियन क्युसिन या रेस्टॉरंटमध्ये हेल्दी व चविष्ट कोरियन फूड मिळते. येथील कोरियन गार्लिक सॉस व्हेज व नॉनव्हेज, किमची सलाद, बिबिंबप व्हेज व नॉनव्हेज तसेच कोरियन ग्रेव्ही विथ स्टिकी राईस हे प्रसिद्ध कोरियन खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. खवय्यांना जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ खाता यावे, कोरियन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा या हेतूने या रेस्टॉरंटने कोरियन फूड सुरू केले. आता ठाणेकर नागरिकांचा देखील या थाई ची एशियन क्युसिन या रेस्टॉरंटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या रेस्टॉरंटमध्ये कोरियन फूडचा आस्वाद खवय्यांना अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. कोरियन फूडचे पदार्पण भारतात अगदी काही काळापूर्वीच झाले असून संपूर्ण भारतामधून या कोरियन फूडला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोरियन फूड बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य भारतात उपलब्ध आहेत परंतु काही सॉसेस हे आयात केले जातात.

पत्ता : शॉप 5, केनोरा बिल्डिंग, हिरानंदानी इस्टेट, पाटलीपाडा, ठाणे

संपर्क : 91374 32083

—————

एशिया वॉक रेस्ट्रो

एशिया वॉक रेस्ट्रो हे कोरियन फूडसाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. कोरियन रमेन, मिसो सूप, कोरियन चिली, किमची, किमची चिकन चिली, किमची फ्राईड राईस तेटोकबोक्की, कोरियन पोट्रिस, बिबिंबप, बुलगोगी चिकन/ मटण, कोरियन फ्राईड राईस अशा बऱ्याच डिश येथे उपलब्ध आहेत. कोरियन पाककलेचा वारसा जपून जास्तीत जास्त खवय्यांपर्यंत कोरियन पदार्थ पोहचवणे या उद्देशाने या रेस्टॉरंटची सुरुवात करण्यात आली आहे. दर्जेदार साहित्य आणि पारंपारिक तंत्रांनी बनवलेल्या कोरियन फूडची चव दाखवण्यासाठी येथील मेनू तयार केला गेला असून येथे भारतीय ट्विस्टसह कोरियन फ्लेवर्सचे मिश्रण असणाऱ्या नाविन्यपूर्ण फ्यूजन डिश देखील ऑफर केल्या जातात. येथील कोरियन फूड चविष्ठ तर आहेच शिवाय हेल्थी सुद्धा आहे. यात विविध प्रकारच्या भाज्या, मांस आणि आंबवलेल्या पदार्थांचा वापर केला जातो. येथील मेन्यूचा दर सर्वांना परवडण्यासारखा आहे त्यामुळे ठाणेकरांची येथे नेहमीच गर्दी असते. गोचुगारू (कोरियन मिरची) हा कोरियन खाद्यपदार्थाचा मुख्य घटक आहे. डोएनजांग हे कोरियन खाद्यपदार्थ जसे की सूप, स्टू, सॉस, मॅरीनेड्स, स्टिर-फ्राईज, ब्रेसेस आणि आंबलेल्या भाज्यांचे पदार्थ (किमची सारखे), तिळाचे तेल हे सर्व मुख्य साहित्य कोरियन फूड तयार करताना वापरले जातात व हे बहुतांश पदार्थ बाहेरहून आयात केले जातात.

पत्ता : शॉप नं ३ , कौसा, मुंब्रा, ठाणे

संपर्क : 98929 46838

—————-

हाना पॅन एशियन किचन अँड बार

ठाण्यात कोरियन डिशची चव चाखायची असेल तर हाना पॅन एशियन किचन अँड बार हे रेस्टॉरंट उत्तम आहे. येथे मेन कोर्समध्ये कोरियन फ्राईड राईस तर स्टार्टर्समध्ये कोरियन नूडल्स, कोटेचीस कंपाउंडर, तीन वेगवेगळ्या फेल्व्हर मध्ये रामेन सुपी नूडल्स मिळतात. येथील रामेन नुडल्स व कोरियन फ्राईड राइसला लोकांची विशेष मागणी आहे. या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या सर्वच डिशेस परवडणाऱ्या असून जास्तीत जास्त तरुण वर्गाची येथे गर्दी असते. येथे मिळणाऱ्या कोरियन फ्राईड राईसच्या स्वीट अँड स्पायसी टेस्टमुळे हे रेस्टॉरंट ठाण्यात प्रसिद्ध आहे. येथील शेफ प्रशिक्षित व अनुभवी आहेत, त्यामुळे ऑथेंटिक कोरियन चव येथे चाखायला मिळते.

पत्ता : शॉप नंबर ३,भक्ती मंदिर, पाचपाखाडी , ठाणे

संपर्क : 96135 48548