ठाणेकर विद्यार्थ्यांनो उच्च शिक्षणासाठी युरोप बेस्ट पर्याय

परदेशात शिक्षण हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. सध्या परदेशात शिक्षण घेण्याकडे भारतीय विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उच्च पगाराची नोकरी, उच्च दर्जाचे शिक्षण आणि जीवनाचा दर्जा अनेक भारतीयांना परदेशी किनाऱ्याकडे खेचत आहे. युरोप हा एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती असलेला खंड आहे. ज्यांच्या भाषा आणि संस्कृतीही समृद्ध आहे. युरोपमध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकशास्त्रापासून इतिहासापर्यंत विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थी युरोपियन संस्कृतीबद्दल जाणून घेऊ शकतात. त्यासोबतच संपूर्ण खंडातील स्थानिकांशी संवाद साधू शकतात. येथे अभ्यास करण्यासाठी अनेक लोकप्रिय विद्यापीठे आहेत. भारताबाहेर ज्यांना शिक्षण घ्यायची इच्छा आहे त्यांनी जर्मनीचा पर्याय म्हणून विचार करावा. ग्लोबल नागरिक व्हावं असं अनेक विद्यार्थ्यांना वाटत असतं. युरोपमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना यशस्वी शैक्षणिक कारकीर्द तसेच यशस्वी करिअरची अधिक संधी असते. चला तर त्याबद्दल जाणून घेऊया….

शिक्षणासाठी युरोप देश का निवडावा

युरोपमध्ये अभ्यास करणे ही संपूर्ण जग एक्सप्लोर करण्याची आणि विविध जीवनशैलीचा अनुभव घेण्याची उत्तम संधी आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी युरोप हे सर्वात लोकप्रिय अभ्यासाचे ठिकाण आहे. युरोपमध्ये शिक्षण घेण्याची अनेक कारणे आहेत. कमी शिक्षण शुल्कापासून ते सांस्कृतिक विविधतेपर्यंत अनेक कारणे देता येतील. युरोपमध्ये अभ्यास करणे ही तुमच्यासाठी इतर संस्कृतींचा शोध घेण्याची आणि जीवनाबद्दल आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन मिळवण्याची एक उत्तम संधी असू शकते. युरोप देशातील शिक्षण हे बाकीच्या देशातील शिक्षणापेक्षा खूप स्वस्त आहे. मध्यमवर्गीय लोकांनाही ते सहज परवडण्यासारखं आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी युरोप हा देश शिक्षणासाठी निवडावा. युरोपमध्ये अभ्यास शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट आणि व्यावसायिकदृष्ट्या विकसित होण्यास मदत करू शकतो. एक युरोपिअन शेंगेन व्हिसा हा २७ युरोपिअन देशात फिरण्यासाठी उपयोगी पडू शकतो.

युरोप खंडात शिकण्याचे फायदे

* युरोपमधील शिक्षण हे कमी खर्चाचे असते.
* स्टुडन्ट व्हिसावर पदवी किंवा मास्टर्स नंतर १८ महिने तेथे राहता येते.
* शिक्षणाचा दर्जा हा उत्कृष्ट आहे.
* युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात एक्सपोजर देखील मिळते.
* युरोपमधील शिक्षण व्यवस्थेप्रमाणेच येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमही खूप चांगले आहेत.
* युरोपमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट जॉब करण्याची परवानगी आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना भरपूर रोजगारही मिळतो.
* व्हिसा प्रक्रियेत कोणतीही अडचण नाही आणि आर्थिक कागदपत्रे कमी आहेत.
* संशोधनातील नवीनतम घडामोडींचे अनुसरण करण्याची संधी.
* रोजगाराची संधी
* पदवी किंवा मास्टर्स नंतर १८ महिने तेथे राहताना तुम्ही नोकरी शोधू शकता. नोकरी मिळवणं हे कुठेही अवघडच असते. पण तुम्ही त्याची व्यवस्थित तयारी केली तर आणि मुलाखत काळजीपूर्वक दिली तर तुम्हाला नक्कीच परदेशात रोजगाराची संधी प्राप्त होते. तेथे पगारही चांगला मिळतो. नोकरी शोधण्यासाठी मुलाखत कशी द्यावी, cv कसा लिहावा याचे मोफत मार्गदर्शनही साऊथ वेस्टर्न युरोपियन कॉरिडॉर संस्था देते. या संस्थेची स्वतःची भरती एजन्सी ही फ्रांकफुर्टमध्ये आहे.

शिक्षणाचा कालावधी

पदवीधरसाठी ३ वर्ष लागतात आणि मास्टरसाठी दीड ते दोन वर्ष लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयाचे सखोल ज्ञान मिळते. युरोपमध्ये अभ्यास करताना हा एक मोठा फरक आहे. प्रकल्प, सादरीकरण, परीक्षा असतात. त्यामुळे या शिक्षण पद्धतीमध्ये स्वतःवर खूप जबाबदारी असते.

प्रवेश प्रक्रिया

प्रवेश प्रक्रिया तुमच्या विविध प्रोफाइलवर अवलंबून असते. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवेश प्रक्रिया ही तुमचा cgpa किती आहे यावर अवलंबून आहे. Cgpa ७.५ किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावा. म्हणजे तुम्हाला जर्मनीसारख्या देशात जिथे नो ट्युशन फी अजूनही आहे तिथे तुम्हाला प्रवेश मिळतो. तिथे शिकताना जर्मन भाषेचे निदान ३ लेव्हल झाले असावे. हे जॉब मिळण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे.

युरोपमध्ये अभ्यास – शिष्यवृत्ती

ज्या विद्यार्थ्यांना युरोपमध्ये शिक्षण घ्यायचे आहे त्यांना युरोपियन युनियन विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देते. शिष्यवृत्ती बहुतेकदा EU किंवा ते शिकत असलेल्या देशाद्वारे निधीद्वारे दिली जाते. हा विभाग विविध प्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी अर्ज कसा करायचा आणि त्यांच्यासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेल्या आवश्यकतांची माहिती देतो. तुम्हाला युरोपमध्ये आणि एखाद्या विशिष्ट देशात अभ्यास करायचा असेल तर तुम्ही इतर विविध शिष्यवृत्तींसाठी अर्ज करू शकता. जगभरातील इच्छुक विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्ती एखाद्या देशातील संस्था किंवा विद्यापीठाद्वारे देऊ केली जाऊ शकते. बऱ्याचवेळा शिष्यवृत्ती या कारणासाठीही मिळते की, तुम्ही एक उत्तम विद्यार्थी आहात किंवा इतरांची मदत करत आहात. येथे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.

सुरुवात कशी करावी

प्रत्येकाने ६ ते ७ महिने समुपदेशन कार्यक्रमाला द्यावे. तुम्ही त्याच्या फॉर्मची माहिती इंटरनेट वरून घेतली तर त्याची खात्री करावी लागते. तुम्ही सर्वात आधी जर्मन भाषा शिकून घ्या. जर्मन भाषा शिकणे हे अत्यंत आवश्यक आहे. जर्मन भाषा ही युरोपमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी आणि लिखित भाषा आहे. जर तुम्हाला युरोपमध्ये जाण्यास स्वारस्य असेल, तर तुम्ही जाण्यापूर्वी जर्मन भाषा शिकू शकता. तुम्ही फ्रेंच आणि इंग्रजीही शिकू शकता. विविध वर्कशॉपमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. या वर्कशॉपमध्ये अनेक गोष्टीची पूर्वतयारी केली जाते.

प्रतिक्रिया

सध्या लोकांमध्ये एक जागरूकता आली आहे. बरेचजण आमच्या संस्थेत येतात तेव्हा सांगतात युएसला (US) जायचच नाही. आमचं सुरुवातीपासून जर्मनीच ठरलय. कारण विद्यार्थी अभ्यास करत असताना बाहेर काय परिस्थिती चालली आहे याचाही अभ्यास विद्यार्थी आणि पालक करत असतात. कुठेतरी ते मनात ठरवूनच येतात. मला विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारताना असे लक्षात आले की, आम्हाला जरी इंटरनेटवर माहिती मिळत असली तरी तुम्ही बोलल्यावर खात्री पटते. संचालिका म्हणून मी स्वत: प्रत्येक मुलाजवळ बसून विद्यापीठाचे फॉर्म भरते. त्यामुळे हा एक विलक्षण अनुभव आहे. मी स्वतः जर्मन भाषा बोलते आणि ही भाषा शिकल्यामुळे मला तो देश कळला. त्यातून मला समजलं की तेथे संधी खूप आहेत. सध्या आम्ही १३ युरोपिअन देशात समुपदेशन करतो. आम्ही विद्यार्थ्यांना ग्लोबल सिटीझन होण्यासाठी प्रोत्साहित तर करतोच पण त्याचबरोबर तेथील ज्ञान घेऊन विद्यार्थी भारतात परत कसे येतील य दृष्टीने त्याचे समुपदेशन करतो. तेही आम्ही तेवढ्याच कळकळीने सांगत असतो. कारण आज भारत विकसित देश होत आहे. त्यामुळे भारतात तुमची जास्त गरज भासणार आहे.

– माधवी माऊसकर खर्शिकर, साऊथ वेस्टन युरोपियन कॉरिडॉर संचालिका

प्रतिक्रिया

मी माझे पदवी शिक्षण महाराष्ट्रातील तांत्रिक संस्थेतून घेतले. त्यानंतर मी काळजीपूर्वक माझा अभ्यास पूर्ण केला आणि जर्मनीमध्ये जाऊन मी मास्टरचे शिक्षण पूर्ण केले. आता मी हॅम्बर्ग सारख्या मोठ्या शहरात राहतो आणि मला उत्तम नोकरी आहे. मला वाटतं मेहनत करायची तयारी असायला हवी मग यश नक्कीच मिळते. मला साऊथ वेस्टर्न युरोपियन कॉरिडॉरमधून योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळाले. मी आता माजी विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना जर्मनीला जायची इच्छा आहे किंवा जे भारतीय विद्यार्थी जर्मनीमध्ये शिकतात त्यांना मदत करतो. मी येथे राहून विद्यार्थ्यांना काय हवे आणि त्यांना कशाची गरज आहे, याबद्दल मार्गदर्शन करतो.

वैभव देवघरे