ठाणे: वर्तकनगर, ठाणे येथील रामचंद्र ठाकूर जलतरण तलावाच्या ११ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक सुजल गमरे आणि रोहित पाटेकर यांच्या नेतृत्वाखाली १४वी राज्यस्तरीय खुली सागरी जलतरण स्पर्धा मालवण 2024 पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा जलचर संघटनेमार्फत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ५०० मीटर स्पर्धेत शोन भाल, अद्विक खसाळे, अरिंजय तारी, सांवी म्हात्रे, एक किलोमीटर स्पर्धेत सावी पाटील, विवेक महाजन, आरवी साटम, विराट पैठणकर, दोन किलोमीटर स्पर्धेत रितुल पवार, पृथ्वी गावकर आणि तीन किलोमीटर स्पर्धेत द्रोण शेंडगे यांनी यश मिळवले.