पॅरा-ॲथलेटिक चॅम्पियन्ससाठी निधी संकलन
मुंबई : मुंबईतील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपनी रुनवाल रिअल्टी आणि प्ले फ्री स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ५.३० ते ९.३० या वेळेत ठाणे हाफ मॅरॅथॉन आयोजित करण्यात आली आहे.
ठाणे पश्चिम, मानपाडा येथील रुनवाल २५ आवर्स लाइफपासून सुरुवात होणारी ही मॅरॅथॉन केवळ आरोग्याचा उत्सव नसून, एका महत्वपूर्ण उद्देशासाठी आहे. या उपक्रमातून मिळणारा निधी भारतातील पॅरा-ॲथलेटिक चॅम्पियन्ससाठी वापरला जाईल, त्यांना कृत्रिम पाय देऊन त्यांच्या स्वप्नांना पंख दिले जातील.
“ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स” या थीमखाली सर्व स्तरांतील धावपटूंना सहभागी होण्याचे आमंत्रण आहे. २१ किमी, १० किमी, पाच किमी आणि एक माईल अशा चार शर्यतींचा पर्याय आहे. अनुभवी ॲथलीट्ससाठी तसेच फक्त मजेत धावण्याचा अनुभव घेण्यासाठीही योग्य प्रकार निवडता येईल.
सर्व सहभागींसाठी ड्राय फिट टी-शर्ट्स, फिनिशर मेडल्स, रुचकर नाश्ता आणि एक हजार रुपयेपेक्षा अधिक किमतीची व्हाउचर्स यासारख्या खास भेटवस्तूंची व्यवस्था आहे. प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना ट्रॉफी, विशेष गिफ्ट्स आणि व्हाउचर्स दिले जातील. नोंदणीसाठी:
https://www.townscript.com/e/thm3 येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.