ठाणे जिल्ह्याने जिंकले धर्मवीर कै. आनंद दिघे साहेब दिव्यांग क्रिकेट चषक

ठाणे: जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सेंट्रल मैदानावर आयोजित केलेल्या धर्मवीर कै. आनंद दिघे साहेब दिव्यांग क्रिकेट चषक स्पर्धेत ठाणे जिल्हा संघ विजयी ठरला.

24 आणि 25 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या या राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत, ठाणे, रायगड, नागपूर, मुंबई, आणि मध्य प्रदेश या पाच संघांनी भाग घेतला.

अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि ठाणे क्रिकेट अँड स्पोर्ट असोसिएशन फॉर डिसेबल्डचे अध्यक्ष सुरेश दुधाणे हे स्वतः उजव्या हाताने दिव्यांग आहेत. त्यांचे गेल्या एक वर्षापासून ठाणे जिल्ह्यात राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धा व्हावी असे स्वप्न होते. त्यांनी दिवस रात्र मेहनत करुन ठाणे येथील क्रिकेटचे द्रोणाचार्य शशिकांत नाईक यांच्या सहकार्याने ते स्वप्न पुर्ण केले. धर्मवीर कै. श्री आनंद दिघे साहेब दिव्यांग क्रिकेट चषक या नावाने राज्यस्तरीय स्पर्धा ठाणे जिल्ह्यात भरवण्याचे अणि दिव्यांग क्रिकेट खेळाडूंना उत्साहित करण्याचे दुहेरी उद्दिष्ट साधला.

तसेच शशिकांत नाईक यांनी मोफत प्रशिक्षण देत ठाणे जिल्ह्याचा दिव्यांग संघ तयार केला. सुरेश दुधाणे यांना कर्णधार म्हणून नेमले. ठाणे क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन फॉर डिसेबल्डची जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे स्वीकारली.

निखिल बूडजडे (जिल्हाप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष) यांच्या हस्ते स्पर्धेचे विजेते ठाणे जिल्हा संघाला सन्मानित करण्यात आले. भविष्यात अशा तीन स्पर्धांचे आयोजन करण्याची नाईक यांची इच्छा आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे दिव्यांग चषक, दिव्यांग चेम्पीयन ट्रॉफी आणि दिव्यांग आयपीएल अशी तीन नावे त्यांनी सुचवली आहेत.