ठाणे शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांचे निधन

ठाणे : ठाणे शहर काँग्रेस प्रवक्ते सचिन मुरलीधर शिंदे यांचे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अल्पशः आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 56 वर्षाचे होते.

ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसस्कार करण्यात आले. यावेळी ठाणे शहरातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, बहिण व भाचा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ठाणे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

सचिन शिंदे हे काँग्रेसचे दिवंगत ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांचे सहकारी होते. त्यांच्या निधनानंतर ठाण्यात काँग्रेस पक्ष रुजविण्यासाठी शिंदे यांनी कसोशिने मेहनत घेतली. ठाणे महानगरपालिकेत परिवहन सेवा सदस्य व माळी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी कार्यरत असताना त्यांनी समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांच्या उत्कर्षासाठी कार्य केले. ठाण्यातील महागिरी परिसरात ते वास्तव्यास होते. गेले दोन आठवडे ते दिर्घ आजाराने रुग्णलयात उपचार घेत होते. मात्र मंंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता ठाणे शहरात पसरताच विविध स्तरातील मंडळींनी अंत्यदर्शनासाठी महागिरी येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभुमीत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, प्रदीप शिंदे, मनोहर डुंबरे, मोहन तिवारी, शैलेश शिंदे, सुभाष कानडे, सुहास देसाई, नारायण पवार, संजय वाघुले, केदार दिघे यांच्यासह ठाणेकरांनी मोठी गर्दी केली होती.